घर महाराष्ट्र Anand Dighe Anniversary: आज आनंद दिघे असते तर त्यांनी शिवसेना सोडली असती...

Anand Dighe Anniversary: आज आनंद दिघे असते तर त्यांनी शिवसेना सोडली असती का?

Subscribe

ज्येष्ठ पत्रकार रवींद्र पोखरकर यांनी एक फेसबूक पोस्ट शेअर करत जर आनंद दिघे असते तर त्यांनी शिवसेना सोडली असती का? असा सवाल उपस्थित करत, एक फेसबूक पोस्ट शेअर केली आहे.

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे गटाने टेंभीनाका येथील आनंद दिघे यांच्या स्मारकला पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर ठाकरे गट खारटन रोड येथील आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी म्हणजेच, शक्तिस्ळथमध्ये गेले. या ठिकणी शिंदे गटाकडून एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आनंद दिघे यांना त्यांचे समर्थक आदरांजली अर्पण करत आहेत. याचदरम्यान, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र पोखरकर यांनी एक फेसबूक पोस्ट शेअर करत जर आनंद दिघे असते तर त्यांनी शिवसेना सोडली असती का? असा सवाल उपस्थित करत, एक फेसबूक पोस्ट शेअर केली आहे. (Anand Dighe death Anniversary If Anand Dighe was here today would he have quit Shiv Sena questioned raised by Ravindra Pokharkar and shared facebook post)

रवींद्र पोखरकरांची पोस्ट जशीच्या तशी

दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे आणि मातोश्रीमध्ये २०००/२००१ च्या दरम्यान काही कुरबुरी सुरु होत्या का ? तर होय..तशी काही वृत्त ठाण्यात आमच्यापर्यंत पोहचत होती. वर्तमानपत्रांमधूनही काही बातम्या यायच्या. आम्हा शिवसैनिकांमध्ये त्याबाबत दबक्या आवाजात काही कुजबुज सुरु असायची.

पण मग दिघेंनी शिवसेना सोडली असती का ? बाळासाहेबांना सोडलं असतं का ?
- Advertisement -

तर तसं वाटत नाही. ते बाळासाहेबांना त्यांचं दैवत आणि मीनाताई ठाकरेंना आईच्या जागी मानत होते. शिवसेना हा त्यांचा श्वास होता. खरोखरच काही मतभेद असले असते आणि ते सहन होण्यापलीकडचे असते तर एकतर त्यांनी सरळ जाऊन बाळासाहेबांकडे आपली नाराजी व्यक्त केली असती आणि त्यातूनही काही समाधानकारक मार्ग निघाला नसता तर ते कदाचित पदावरून बाजूला झाले असते पण त्यांनी शिवसेनेशी आणि बाळासाहेबांशी प्रतारणा अजिबात केली नसती असं मी जे काही त्यांना किमान पंधरा वर्षे ओळखत होतो त्यातून वाटतं.

हे घाणेरडं राजकारण

त्यांच्या अकाली आणि आकस्मिक जाण्यानंतर तब्बल वीस-बावीस वर्षांनी त्यांच्या मृत्यूविषयी संशय निर्माण करणारी वक्तव्य करणं किंवा मातोश्री आणि त्यांच्यात जणू काही पराकोटीचं वैमनस्य निर्माण झालं होतं असं चित्र निर्माण करणं हे घाणेरडं राजकारण आहे. तुम्हाला काही पक्कं माहिती होतं किंवा संशय होता तर तब्बल वीस वर्षे तुम्ही गप्प का बसलात ? असो..

- Advertisement -

स्व.आनंद दिघे यांच्यासोबत राहिलेल्या, काम केलेल्या माझ्यासारख्या अनेक लोकांना या सगळ्या वादांचा आणि घाणेरड्या राजकारणाचा मानसिक त्रास होतो म्हणून हे लिहावंसं वाटलं.

२००१ साली आजच्याच दिवशी म्हणजे २६ ऑगस्टला त्यांचं निधन झालं होतं. अशी पोस्ट ज्येष्ठ पत्रकार रवींद्र पोखरकर यांनी शेअर केली आहे.

(त्यांच्यासोबतचा माझा हा फोटो - 2000 सालातील )
(त्यांच्यासोबतचा माझा हा फोटो – 2000 सालातील )

( हेही वाचा: PM Narendra Modi शास्त्रज्ञांना घेऊन रोड शो केला असता तर अधिक आनंद झाला असता – विजय वडेट्टीवार )

- Advertisment -