घरताज्या घडामोडीउत्तराखंड : ग्लेशियर बर्स्ट म्हणजे काय ? आऊटबर्स्ट फ्लडची स्थिती कशी निर्माण...

उत्तराखंड : ग्लेशियर बर्स्ट म्हणजे काय ? आऊटबर्स्ट फ्लडची स्थिती कशी निर्माण होते ? जाणून घ्या

Subscribe

उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ग्लेशियर बर्स्टमुळे झालेले मोठे नुकसान पाहता आता युद्ध पातळीवर याठिकाणी काम सुरू आहे. नॅशनल पॉवर थर्मल कॉर्पोरेशनच्या तपोवन टनेललाही यामुळे मोठा फटका बसलेला आहे. काही दिवसांपूर्वीच हिमवृष्टी झाल्याने या भागातल्या बचावकार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणूनच निसर्गावर मोठी दारोमदार असणार आहे. त्यातूनच याठिकाणच्या संकटावर मात करणे येत्या दिवसात शक्य होणार आहे. चमोलीच्या दुर्घटनेने नैसर्गिक आपत्कालीन घटनांचे अनेकदा साक्षीदार राहिलेले राज्य उत्तराखंड हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. चमोलीच्या ग्लेशियर बर्स्टच्या घटनेनंतर आलेल्या पुरामुळे उत्तराखंडवर पुन्हा एकदा मोठे संकट आले आहे. उत्तराखंडमध्ये याआधीही केदारनाथच्या घटनेने हादरला होता. या घटनेतही अनेक लोकांचा जीव गेला होता. उत्तराखंडमधील अशाच काही पाच घटना, ज्या घटनांमुळे संपुर्ण देश हादरला होता.

- Advertisement -

उत्तराखंडमधील पाच मोठ्या घटना 

१. रूद्रप्रयागच्या केदारनाथ येथे १६ जून २०१३ च्या घटनेने संपुर्ण मानवतेसाठी एक हादरा बसला होता. या घटनेत सुमारे ४५०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. तर अनेक लोक बेपत्ता झाले होते. घटनेमुळे जवळपास ४ हजारांहून अधिक गावांचा संपर्क तूटला होता. अनेक लोकांचा मृत्यू हा राहत्या घरीच झाला होता. भारतीय सेना, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आइबीपी च्या टीमने मिळून महाअभियान हाती घेत केदारनाथ यात्रेच्या मार्गावर अडकलेल्या ३० हजार लोकांची सुटका केली होती.

२. वर्ष २०२० मध्ये पिथौरागढ येथे घडलेल्या मोठ्या घटनेत चैसर गावात एक घर संपुर्णपणे दबले. घटना सकाळी इतक्या वेगाने घडली ज्यामध्ये एकालाही बाहेर पडणे शक्य झाले नाही.

- Advertisement -

३. ऑगस्ट २०१९ उत्तरकाशीच्या मोरी तहसीलमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नाल्यांना पूर येतानाच २०० कोटी रूपयांचे नुकसान होत, १८ लोकांचा मृत्यू झाला होता.

४. उत्तरकाशीच्या १९९१ साली आलेल्या भूकंपामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याचा घटना घडला होत्या.

५. वर्ष २०१९ मध्ये उत्तरकाशीच्या आराकोटमध्ये घडलेल्या घटनेमुळे संपुर्ण देश हादरला होता. या घटनेने आजुबाजुच्या परिसरात ७० किलोमीटरचा परिसरात याचा प्रभाव दिसून आला होता.

ग्लेशियर म्हणजे काय ? किती प्रकारचे आहेत?

ग्लेशियर म्हणजे बर्फ एका जागी जमा झाल्यामुळे होणारी परिस्थिती. या ग्लेशियरचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे अल्पाइन आणि दुसरा प्रकार म्हणजे आइस शीट्स. जो ग्लेशियर पर्वतावर असतो त्याला अल्पाइन श्रेणीतला ग्लेशियर म्हणून संबोधले जाते. ग्लेशियर कोसळण्यासाठी कोणतही एकच कारण नसते. अनेक कारणामुळे हे ग्लेशियर कोसळण्याच्या घटना घडतात. गुरूत्वाकर्षण आणि ग्लेशियरच्या किनाऱ्यावर तणाव निर्माण झाल्याने हे कोसळण्याच्या घटना घडतात.

जागतिक पातळीवरचा सध्याचा मोठा विषय म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगने बर्फ वितळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे ग्लेशियरचा एक तुकडा वेगळा होऊन अशा घटना घडतात. ग्लेशियरच्या बर्फाचा तुकडा वेगळा होतो तेव्हा त्याला काल्विंग असे म्हणतात. उत्तराखंड येथे घडलेल्या घटनेत ग्लेशियर कोसळण्याचे अजुनही कोणतेच नेमके कारण समोर आलेले नाही.

‘ग्लेशियर’मुळे पूर येणाची काय कारणे आहेत ?

ग्लेशियर तुटून पूर येण्याची घटना खूपच भयावह अशी असते. असे मानले जाते की पूराची परिस्थिती तेव्हाच उद्भवते जेव्हा ग्लेशियरच्या दरम्यान ड्रेनेज ब्लॉक होतात. त्यानंतर पाण्याचा विसर्ग होऊन हे पाणी आपला रस्ता तयार करते. जेव्हा पाणी मोठ्या प्रमाणात ग्लेशियरच्या दरम्यान वाहते तेव्हा बर्फ विरघळण्याची प्रक्रिया वेगाने वाढते. ग्लेशियरचा बर्फ अनेकदा हळू हळू विरघळतो. पण अनेकदा तडे गेल्याने बर्फ वितळण्याचा वेग वाढतो. त्यामुळेच हळूवार बर्फ वितळण्याच्या प्रक्रियेला वेग येतो. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहातही वेग येऊ लागतो. या घटनेलाच आऊटबर्स्ट फ्लड असे म्हणतात. सामान्यपणे पर्वताच्या परिसरात अशी परिस्थिती दिसून येते. प्रत्येकवर्षी अशा स्वरूपाचे ग्लेशियर कोसळत असतात. काही ठिकाणी ग्लेशियर दोन ते तीन वर्षांच्या अंतराने कोसळतात. त्यामध्येच काही असेही ग्लेशियर आहेत, ज्यांच्या कोसळण्याचा अंदाज लावणे कठीण असतो.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -