घरदेश-विदेशराहुल गांधींचं ट्विट आज पाकिस्तानात हेडलाईनला असेल - भाजप

राहुल गांधींचं ट्विट आज पाकिस्तानात हेडलाईनला असेल – भाजप

Subscribe

राहुल गांधी यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंदेर मोदी यांच्या परराष्ट्रीय धोरणार टीका केली आहे. त्यांनी केलेली ही टीका आज पाकिस्तानात हेडलाईनला असेल, असे केंद्रिय मंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले आहेत.

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा मंडळात चीनने पुन्हा भारताच्या पाठीत खंजीर खुपसले आहे. त्यामुळे पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याच्या प्रयत्नावर पाणी पडले आहे. दरम्यान, याच मुद्द्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी चीनच्या अध्यक्षांना घाबरतात, असा टोला त्यांनी लगावला आहे. त्यांच्या या ट्विटवर भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रिय मंत्री रवीशंकर प्रसाद राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधींचे हे ट्विट आज पाकिस्तानात हेडलाईन असेल, असे रवीशंकर प्रसाद म्हणाले आहेत.

हेही वाचा – मोदी दुबळे, चीनला घाबरतात – राहुल गांधी

- Advertisement -

काय म्हणाले रवीशंकर प्रसाद?

रवीशंकर प्रसाद म्हणाले की, राहुल गांधींना कसं वागावं आणि कसं बोलावं याची जाणीव नाही. राहुल गांधी जास्त वाचन करत नाहीत. आम्हाला वाटलं होतं काँग्रेस पक्षाला इतका अनुभव असताना परराष्ट्र गोष्टींसंबंधी त्यांना योग्य सल्ले दिले गेले असतील. २००९ मध्ये युपीएच्या कार्यकाळात चीनने अशाचप्रकारे अडथळा आणला होता. त्यावेळी तुम्ही काहीच का बोलला नाहीत? राहुल गांधींचं ट्विट आज पाकिस्तानात हेडलाईनला असेल. यामुळे राहुल गांधींना आनंद मिळेल. यापुढे रवीशंकर प्रसाद म्हणाले की, ‘राहुल गांधी आपले चीनसोबत चांगले संबंध असल्याचा दावा करतात. डोकलाम वाद सुरु असताना तुम्ही चीनच्या अधिकाऱ्यांना भेटायला गेला होता. मानसरोवर दौऱ्यावेळी चीनच्या अधिकाऱ्यांना तुम्हाला भेटायचे होते. मग मसूद अझहरला दहशतवादी ठरवण्यासाठी तुम्ही आपल्या संबंधांचा फायदा का घेतला नाही?’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -