घरदेश-विदेश'देशाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचलेली सहन करणार नाही'

‘देशाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचलेली सहन करणार नाही’

Subscribe

भारत कमकुवत देश नसून कोणत्याही आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देऊ शकतो, हे चीन सीमेवरील संघर्षाच्या परिस्थितीच्या हाताळणीतून भारताने दाखवून दिले आहे. दरम्यान भारताला शांततेच्या मार्गाने तोडगा हवा आहे; पण देशाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचलेली सहन केली जाणार नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह दुंडिगल येथील एअर फोर्स अॅकॅडमीच्या दीक्षांत संचलनाच्या कार्यक्रमावेळी शनिवारी बोलत होते.

यावेळी त्यांनी पूर्व लडाखमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर भारत आणि चीन एकमेकांसमोर सात महिने तणावपूर्ण परिस्थितीशी सामना करत होते. तर कोरोनाचे संकट सुरू असताना चीनचा पवित्रा त्यांचे हेतू दर्शवत होता, असेही राजनाथसिंह म्हणाले. ‘चीनसोबतचे वाद मिटविण्यासाठी राजकीय आणि लष्कराच्या स्तरावर अनेकदा चर्चा झाल्या. भारताला संघर्ष नको; तर शांतता हवी आहे,’ असे राजनाथसिंह म्हणाले. त्यांनी पाकिस्तानचाही समाचार घेतला.

- Advertisement -

दरम्यान, ‘भारताकडून चार वेळा युद्ध हरल्यानंतरही पाकिस्तानच्या सीमेवरील कुरापती सुरूच आहेत. दहशतवादाच्या रूपाने पाकिस्तानने ‘प्रॉक्सी वॉर’ सुरू केले आहे. सशस्त्र दले आणि पोलिस दहशतवादाशी प्रभावीपणे लढा देत असल्याचेही त्यांनी सांगितले. भारताच्या भूमिकेविषयी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, ‘दहशतवादाशी केवळ देशातच लढले जात नसून; सीमेपलीकडेही जाऊन संपवले जात आहे. बालाकोटमध्ये केलेल्या एअरस्ट्राइकमुळे जगाला भारताचे सामर्थ्य, भारताचे हेतू आणि दहशतवादाविरुद्धची ठाम भूमिका दिसली,’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -