घरदेश-विदेश'हिंदु, ख्रिश्चनांचा DNA सारखाच'

‘हिंदु, ख्रिश्चनांचा DNA सारखाच’

Subscribe

मी केव्हाच ख्रिश्चनविरोधी नव्हतो. शिवाय, हिंदु आणि ख्रिश्चनांचा DNA सारखाच असल्याचं यावेळी सुभाष वेलिंगकर यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्यातील माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर आता मवाळ झाल्याचे पाहायाला मिळत आहेत. मी केव्हाच ख्रिश्चनविरोधी नव्हतो. शिवाय, हिंदु आणि ख्रिश्चनांचा DNA सारखाच असल्याचं यावेळी सुभाष वेलिंगकर यांनी म्हटलं आहे. या विधानावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असतानाचे वेलिंगकर आणि आत्ताचे वेलिंगकर यामध्ये खूप फरक असल्याचे बोलले जात आहे. मी कॉन्वेंट शाळांच्या विरोधात असल्याच्या खोट्या अफवा पसरवल्या जातात. पण, मी ख्रिश्चनांच्या विरोधात केव्हाच नव्हतो. हिंदु आणि ख्रिश्चनांचा DNA सारखाच आहे. हिंदू, मुस्लीम व ख्रिश्चन असा भेदभाव केव्हाच केला नाही. सर्व जण समान आहेत. सर्वांना समान न्याय मिळायला हवा. मी ख्रिश्चनांशी संपर्क साधेन आमि त्यांच्या मनात काही गैरसमज असतील तर दूर करेन असं देखील यावेळी वेलिंगकर यांनी म्हटलं आहे.

२००६ साली वेलिंगकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला रामराम केलं. दरम्यान, चर्चशी संबंधित कॉन्वेंट शाळांचं अनुदान ठेवण्याचा निर्णय भाजप मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी घेतला. या शाळांनी सुचनांचं माध्यम कोकणीवरून इंग्रजी केलं. या निर्णयाला सुभाष वेलिंगकरांनी विरोध केला होता. त्यानंतर त्यांनी संघाला रामराम केला होता.

- Advertisement -

नुकताच सुभाष वेलिंगकर यांनी गोवा सुरक्षा मंच पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांनी राजकारणात सक्रीय होण्याचे संकेत दिले. रविवारी  गोवा सुरक्षा मंचाच्या कार्यकर्त्यांना वेलिंगकरांनी मार्गदर्शन केले. लोकसभा निवडणुकीमध्ये सुभाष वेलिंगकर मांद्रेम इथून लोकसभेची निवडणूकर लढवणार आहेत. अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -