घरदेश-विदेशसंत परमहंस दास यांचा राम मंदिरासाठी आत्मदहनाचा इशारा

संत परमहंस दास यांचा राम मंदिरासाठी आत्मदहनाचा इशारा

Subscribe

राम मंदिरासाच्या उभारणीसाठी तपस्वी छावणीचे संत परमहंस दास यांनी सरकारला आत्मदहनाचा इशारा दिला आहे. सरकारने ६ डिसेंबरपर्यंत अयोध्येतील राम मंदिर उभारण्याची तारीख जाहीर करावी, अन्यथा चिता रचून आत्मदहन करेल, असा इशारा संत परमसंह दास यांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आहे. अयोध्येत राम मंदिर उभारले जावे यासाठी देशातील सर्व हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. आता याच पार्श्वभूमीवर तपस्वी छावणीचे संत परमहंस दास यांनी सरकारला आत्मदहनाचा इशारा दिला आहे. सरकारने ६ डिसेंबरपर्यंत अयोध्येतील राम मंदिर उभारण्याची तारीख जाहीर करावी अन्यथा चिता रचून आत्मदहन करेल, असा इशारा संत परमहंस दास यांनी दिला आहे.

हेही वाचा – राम मंदिर बांधण्यावरुन जैश-ए-मोहम्मदचा मोरक्याची भारताला धमकी

- Advertisement -

सीतामढीत करणार आत्मदहन

भदोहीच्या सीतामढीत सीतेने आत्मदहन केल्याची पौराणिक कथा आहे. याच कथेनुसार त्या ठिकाणी संत परमहंस दास माती मस्तकावर धारण करुन ६ डिसेंबर रोजी चितेवर बसणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यासंबंधी त्यांनी सीतामढी येथील माती कलशात येऊन घोषणा केली आहे. अयोध्येचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक जोगेंद्र कुमार यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. याप्रकरणी जोगेंद्र कुमार यांनी सांगितले की, अयोध्येतील प्रत्येक घडामोडींकडे आमचे लक्ष आहे. शिवाय, गुप्तचर विभाग ही याकडे लक्ष ठेवून असून प्रशासन योग्यवेळी योग्य कारवाई करेल. त्यामुळे कुणालाही आत्मदहन करु दिले जाणार नाही, असे जोगेंद्र कुमार म्हणाले.

हेही वाचा – अन्यथा राम मंदिराच्या निर्मितीला सुरुवात करणार; विहिंपचा इशारा

- Advertisement -

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राममंदिर

२०१९ला लोकसभा निवडणूक असणार आहे. २०१४च्या निवडणूक प्रचारात मोदी सरकारने राम मंदिर उभारण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, निवडून आल्यानंतर साडे चार वर्षे उलटून गेले तरीही राम मंदिराचे आश्वासानाची पूर्तता मोदी सरकारकडून झालेली नाही. आता पुन्हा राम मंदिराच्या मुद्यावर राजकारण घडताना दिसत आहे. यातच शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा केला. त्याचबरोबर हिंदू संघटनादेखील राम मंदिरासाठी आक्रमक झाल्या आहेत. त्यातच अयोध्येत महासभेचे आयोजन करण्यात आले होते. तर बऱ्याच साधूंकडून तीन दिवसीय धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर आता संत परमहंस दास यांनी राम मंदिर उभारण्याची तारीख जाहीर केली नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.


हेही वाचा – राम मंदिर बांधू इच्छिणार्‍यांनी काही काळ शांत राहावे – आठवले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -