घरमहाराष्ट्रनक्षलवाद्यांची गडचिरोलीमध्ये पुन्हा जाळपोळ!

नक्षलवाद्यांची गडचिरोलीमध्ये पुन्हा जाळपोळ!

Subscribe

ही घटना उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या जवळच झाल्याने नागरिकामध्ये दहशत निर्माण झाली आहे. 

शुक्रावारी ३० नोव्हेंबरक रोजी एटापल्ली तालुक्यातील हालेवारा-गट्टेपल्ली येथे नक्षलवाद्यांनी १९ वाहनांची जाळपोळ केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा २ डिसेंबरच्या रात्री नक्षवलवाद्यांनी पुन्हा एका ट्रकला आग लावली. हेडरी उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या बाजूला उभ्या केलेल्या एका ट्रकला रविवारी रात्री सशस्त्र नक्षल्यांनी पेटवून दिले. नक्सलवादी २ ते ८ डिसेंबर दरम्यान “पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी” अर्थात पीएलजीए-सप्ताह पाळतात. या कालावधीत नक्षलवादी मोठ्या प्रमाणात जाळपोळ व हिंसक कारवाया करतात. कालची कारवाई उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या जवळच झाल्याने नागरिकामध्ये दहशत निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यात पोलीसांच्या मोठ्या कारवाईत ४० नक्सली मारल्या गेल्यानंतर नक्सल चळवळ थंडावली होती त्यांच्या कारवायाला लगाम घालण्यात पोलीस यशस्वी झाले होते.

मात्र, जहाल नक्सली नंबाला केशव राव उर्फ गगन्ना उर्फ बसवराजूकडे माओवादी कंम्युनिस्ट पक्षाच्या महासचिवाची सूत्रे गेल्यानंतर नक्सलयांच्या हिसंक कारवाया वाढल्या आहेत. बसवराजू हा आक्रमक व हिंसक कारवाया करण्यासाठी व या कारवायाचे नियोजन करण्यात माहीर समजला जातो. वाहने पेटवून हिंसाचार माजवणे हा नक्षल्यांच्या नव्या कार्यशैलीचा भाग बनल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

छत्तीसगडमध्येही धुमाकूळ

गेल्याच महिन्यात छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये नक्सलवाद्यांनी हल्ला केला होता. क्षलवाद्यांनी सीआयएसएफ जवानांच्या बसवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये एक सीआयएसएफचा जवान शहीद झाला होता तर तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नक्षलवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला. एनएमडीसीची बस दुपारी आकाशनगरवरुन बचेलीला भाजी खरेदी करण्यासाठी गेली होती. यामध्ये सीआयएसएफचे काही जवान देखील होते. भाजी खरेदी केल्यानंतर बस आकाशनगरला परत निघाली होती. त्यावेळी आकाशनगरच्या सहा नंबर रोडवर नक्षलवाद्यांनी सुरुंगाचा स्फोट केला. या स्फोटामध्ये सीआयएसएफचा एक जवान, बस चालक, परिचालक आणि क्लीनर यांचा जागीच मृत्यू झाला. तर बसमध्ये असणारे इतर दोन जवान जखमी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -