घरताज्या घडामोडीWeather Alert : देशातील अनेक राज्यात कडाक्याची थंडी ; पाहा, तुमच्या राज्याची...

Weather Alert : देशातील अनेक राज्यात कडाक्याची थंडी ; पाहा, तुमच्या राज्याची स्थिती

Subscribe

काही दिवसांपासून उन्हाचा तडाका पाहता थंडी जात आहे असे वाटत होते. मात्र, देशातील अनेक राज्यात आज कडाक्याची थंडी वाढली आहे. अवकाळी पावसाची संततधार आणी धुक्यामुळे नागरिकांचा दिनक्रमांवर याचे पडसाद पडत आहेत. दिल्लीपासून हरियाणापर्यंत हवामानाचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याशिवाय दृश्यमानता कमालीची कमी झाल्याने वाहतुकीवरही मोठा परिणाम होत आहे.

काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा पाहता थंडी कमी होत आहे, असे वाटत होते. मात्र, देशातील अनेक राज्यात आज कडाक्याची थंडी वाढली आहे. अवकाळी पावसाची संततधार आणी धुक्यामुळे नागरिकांचा दिनक्रमांवर याचे पडसाद पडत आहेत. दिल्लीपासून हरियाणापर्यंत हवामानाचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याशिवाय दृश्यमानता कमालीची कमी झाल्याने वाहतुकीवरही मोठा परिणाम होत आहे. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दिल्लीचे तापमान 18 अंश तर हरियाणाचे तापमान 16 अंश नोंदवले गेले होते.हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, 9 आणि 10 फेब्रुवारीला पुन्हा एकदा हवामान बदलले असा इशारा हवामान खात्याने दिला होता . या पावसामुळे जोरदार थंड वारे आणि धुके नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे.

- Advertisement -

हरियाणा आणि दिल्लीमध्ये पाऊस आणि हवामानाच्या कडक प्रकृतीमुळे लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. पाऊस आणि धुक्यामुळे दृश्यमानता ५०० मीटरपेक्षा कमी झाली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि लगतच्या भागावर असलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल झाला असून देशाच्या काही भागात पाऊस पडत आहे. याशिवाय दिल्ली आणि हरियाणातही थंडी वाढत आहे.

दुसरीकडे, डोंगरावर पुन्हा एकदा नवीन बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातही थंडीचा परिणाम दिसून येत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, गुरुवारीही म्हणजेच 10 फेब्रुवारीलाही हवामान असेच राहील. त्यामुळे नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागू शकते. त्याचवेळी, 11 फेब्रुवारीपासून हवामानात पुन्हा बदल झालेले दिसून येतील

- Advertisement -

हे ही वाचा – महाराष्ट्राच्या नद्यांमध्ये मृतदेह फेकले नाहीत, राऊतांचा महाराष्ट्राला सुपरस्प्रेडर ठरवणाऱ्यांवर संताप


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -