घर देश-विदेश जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका कधी घेता? सरन्यायाधीशांनी केंद्र सरकारला फटकारले

जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका कधी घेता? सरन्यायाधीशांनी केंद्र सरकारला फटकारले

Subscribe

कलम 370 हटविल्याच्या मुद्द्यावर अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या असून, सर्वोच्च न्यायालयात त्यावर सुनावणी सुरू आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवून आता चार वर्ष उलटली आहेत. कलम 370 हटवल्याच्याविरोधात सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका कधी घेता? लोकशाही प्रक्रिया राज्यात सुरू राहण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत. असा सवाल करत केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले.(When will elections be held in Jammu and Kashmir? The Chief Justice reprimanded the Central Government)

अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या केंद्र सरकारने त्यांच्या अजेंड्यावर असलेले दोन मुद्दे म्हणजे जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवणे आणि अयोद्धेतील राम मंदिर बनवणे यापैकी पहिला मुद्दा कलम 370 हे मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये पूर्ण करण्यात आले तर दुसऱ्या टर्ममध्ये राममंदिर. दरम्यान जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याला चार वर्ष पूर्ण होत असून, या राज्यातील जनजीवन सध्या पूर्वपदावर येत आहे. मात्र अद्याप या राज्यात अद्याप निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे लोकशाही प्रक्रिया या राज्यात ठप्प असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कलम 370 हटविल्याच्या मुद्द्यावर अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या असून, सर्वोच्च न्यायालयात त्यावर सुनावणी सुरू आहे. या सुनावणी दरम्यान सर न्यायाधीशांनी हा प्रश्न केंद्राला विचारला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मोदींकडून राखी पौर्णिमेनिमित्त महिलांना भेट; गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपये कपात

काय म्हणाले सरन्यायाधीश, वाचा-

जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविल्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीवेळी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सरकारला सवाल केला की, तुम्ही निवडणुका कधी घेणार आहात? त्यावर तुषार मेहता म्हणाले, निवडणुकांची तयारी सध्या सुरु आहे, आम्ही निवडणुका घेण्याच्या दिशेने चाललो आहोत त्यावर चंद्रचूड म्हणाले की, लोकशाही प्रक्रिया राज्यात सुरू होणे महत्वाचं आहे, त्यासाठी रोडमॅप तयार करा असे आदेशही त्यांनी केंद्र सरकारला दिले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : स्वत:ला सिद्ध करण्याऐवजी स्वत:ला शोधा, आनंद महिद्रा यांचा ‘त्या’ विद्यार्थ्यांना सल्ला

लोकसभेच्या निवडणुकापूर्वी होऊ शकतात निवडणुका

2024 मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्या आधी जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजण्याचे चिन्हे आहेत. तेव्हा जम्मू काश्मीरमध्ये राजकीय वातावरण पुन्हा तापणार असून, मेहबुबा मुफ्ती आणि भाजप, कॉंग्रेस पक्ष पुन्हा सक्रीय होऊ शकतात.

- Advertisment -