घरदेश-विदेशदेशातील ज्वलंत विषय सोडून ‘प्रचारमंत्री’ इव्हेंटबाजीत मग्न; पंतप्रधान ‘महागाई पे चर्चा’ कधी...

देशातील ज्वलंत विषय सोडून ‘प्रचारमंत्री’ इव्हेंटबाजीत मग्न; पंतप्रधान ‘महागाई पे चर्चा’ कधी करणार?- नाना पटोले

Subscribe

‘चाय पे चर्चा’, ‘परिक्षा पे चर्चा’ करणारे पंतप्रधान मोदी ‘महागाई पे चर्चा’ कधी करणार? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.

महागाई, ढासळती अर्थव्यवस्था, बेरोजगारीसह देशात ज्वलंत प्रश्न असताना त्यावर लक्ष देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ नाही. जनता महागाईने होरपळत आहे, तरुण वर्ग बेरोजगारीने त्रस्त आहे, शेतकरी, कामगारांचे प्रश्न आहेत त्यावर पंतप्रधान बोलत नाहीत. ‘चाय पे चर्चा’, ‘परिक्षा पे चर्चा’ करणारे पंतप्रधान मोदी ‘महागाई पे चर्चा’ कधी करणार? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.

”देशातील जनतेची सकाळ सध्या महागाईच्या बातमीने होते. दररोज वाढणा-या इंधनाच्या किंमतीने आणि महागाईने सर्वसमान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे. दहा दिवस दररोज पेट्रोल डिझेलची दरवाढ करुन आज व्यावसायीक गॅस सिंलिंडर २५० रुपयांनी महाग केला. या महागाईचे सर्वच स्तरातील लोकांना चटके बसत आहेत. वाढत्या महागाईने चहा सुद्धा महाग झाला आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यात केंद्र सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नाही. या महत्वाच्या विषयावर लक्ष देण्यास पंतप्रधान मोदी यांना वेळ नाही मात्र विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी मार्गदर्शन करण्याच्या नावाखाली परिक्षा पे चर्चा करत आहे. अशीच चर्चा त्यांनी देशातील महागाईसह इतर ज्वलंत प्रश्नावरही करायला पाहिजे.”, असं नाना पटोले यांनी म्हटलं.

- Advertisement -

”ज्या व्यक्तीच्या शिक्षणाबद्दल ठोस माहिती नाही, स्वतःच्या डिग्रीचा पत्ता नाही, ती बोगस आहे असा आरोप केला जात आहे तेच विद्यार्थ्यांना परिक्षेबद्दल मार्गदर्शन करत आहेत. विद्यार्थी व पालक दोघांनाही भवितव्याच्या चिंतेने ग्रासले असून पंतप्रधान मोदी मात्र त्यांना कोरडे सल्ले देण्याचे काम करत आहेत. गटारातल्या गॅसवर चहा करण्याचा किस्सा सांगणाऱ्या मोदींकडून विद्यार्थ्यांनी काय धडा घ्यावा”, असंही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या 5 व्या भागातून यंदा बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये इयत्ता 9वी ते 12वीच्या सुमारे 1000 मुलांना मोदींनी संबोधित केलं. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी पालकांना तसेच शिक्षकांना एक महत्त्वाचा सल्ला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “सर्वप्रथम मी कुटुंबातील सदस्यांना आणि शिक्षकांना सांगू इच्छितो की, तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका, जी तुम्ही पूर्ण करू शकत नाही. या सर्व बाबी आपल्या मुलांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत चिंतेचा विषय आहेत. पूर्वी शिक्षकांचा कुटुंबाशी संबंध असायचा. कुटुंब आपल्या मुलांसाठी काय विचार करतात हे शिक्षक परिचित होते. शिक्षक काय करतात हे कुटुंब परिचित होते म्हणजेच शिक्षण शाळेत गेले की घरात, सगळे एकाच व्यासपीठावर होते”, असं म्हटलं.

- Advertisement -

हेही वाचा – Pariksha Pe Charcha : पंतप्रधान मोदींनी पालकांसह शिक्षकांना दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -