घरताज्या घडामोडीमाझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास, गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या बातमीचे मुख्यमंत्र्यांकडून खंडन

माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास, गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या बातमीचे मुख्यमंत्र्यांकडून खंडन

Subscribe

महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री, नेते आणि आमदार नाराज असल्याच्या वारंवार चर्चा सुरु आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहविभागावर नाराजी व्यक्त केली असल्याच्या बातम्या फिरत आहेत. मात्र माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर नाराज असल्याच्या बातम्यांचे खंडन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत केद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवर आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करण्यात येत असल्याच्या प्रकरणावर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यामध्ये वर्षा निवसस्थानी बैठक झाली. महाविकास आघाडीमधील नाराजी, भाजप नेत्यांविरोधात आरोपांचे पुरावे दिले असून कारवाई होत नसल्यामुळे जाहीरपणे संजय राऊत यांनी व्यक्त केलेली नाराजी यावरुन मुख्यमंत्री देखील गृहविभागावर नाराज असल्याचे बोलले जात होते. यावरच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची चर्चा झाली का? असा सवाल उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली आहे.

- Advertisement -

नाराजीच्या चर्चांचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून खंडन

गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही माध्यमांवर येत आहेत. या बातम्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन केले आहे. अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे, आणि ते उत्तम काम करीत आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री गृहमंत्र्यांमध्ये तासभर चर्चा

गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची तासभर बैठक सुरु होती. गृहखात्यावर शिवसेनेतील नेते नाराज असल्याची माहिती आली होती. कारण शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर केंद्रीय यंत्रणेचा ससेमीरा सुरु आहे. तसेच भाजपच्या नेत्यांवर राज्य सरकार चौकशी करत आहे. त्या कारवाईला वेग येताना दिसत नाही आहे. त्यामुळे या कारवाईत वेग यावा अशी शिवसेनेच्या नेत्यांचे मत आहे. अशी कारवाई होत नसेल तर गृहखाते शिवसेनेकडे देण्यात यावे जेणेकरुन कारवाई वेगाने करण्यात येईल असे शिवसेनेच्या नेत्यांचे मत आहे. याबाबत महाविकास आघाडी सरकारमध्ये वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : नाना पटोलेंचे वकील सतीश उकेंवर मूळ कारवाई नागपूर पोलिसांची, फडणवीसांची ईडी कारवाईवर प्रतिक्रिया

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -