घरदेश-विदेशराम मंदिराचे बांधकाम केव्हा पूर्ण होणार? अमित शाहांकडून मोठा खुलासा

राम मंदिराचे बांधकाम केव्हा पूर्ण होणार? अमित शाहांकडून मोठा खुलासा

Subscribe

भारताला सुरक्षित बनवण्याचं आश्वसान आम्ही दिलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशालाच्या सीमांना सुरक्षित केलं आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळापेक्षा सध्या भारताच्या सर्व सीमा सुरक्षित आहेत. तसंच, अतंर्गत सुरक्षाही मजबूत करण्यात आली आहे. याची जाणीव संपूर्ण जगाला आहे, असंही अमित शहांनी स्पष्ट केलं.

अहमदाबाद – अयोध्येतील श्रीराम मंदिराचं (Shri Ram Temple) काम केव्हा पूर्ण होणार असा प्रश्न रामभक्तांकडून विचारला जातोय. अयोध्येत श्रीरामाचं मंदिर निर्माण होणं ही प्रतिष्ठेची बाब बनली आहे. त्यामुळे या मंदिराकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रामभक्तांकडून मंदिर निर्माणाची तारीख विचारण्यात येत असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. एवढंच नव्हे तर तिकिटही बूक करण्यास सांगितलं आहे. जानेवारी २०२४ पर्यंत राम मंदिर पूर्ण होईल, असं अमित शाह म्हणाले. एका हिंदी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. (When will Ram Mandir be completed? A big revelation from Amit Shah)

हेही वाचा – 400 कोटींचा व्यवहार करत श्रीराम मंदिराची जमीन परस्पर विकली; विश्वस्तांची प्रशासनाकडे धाव

- Advertisement -

कलम ३७० हटवण्याची मागणी १९५० पासून करण्यात येत होती. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात हा कलम हटवून दाखवण्याची हिंमत केली. ज्या भूमीवर प्रभू रामाचा जन्म झाला त्याच भूमीवर त्याचं मंदिर बनवण्यात यावं अशी भक्तांची धारणा होती. पण काँग्रेसचे लोक यावरून टोमणे मारत होते. मंदिर वहीं बनाऐंगे पर तारीख नहीं बताऐंगे असा टोला काँग्रेसने लगावला होता. पण तारीख सांगण्याची गरज नाही. जानेवारी २०२४ पर्यंत मंदिर पूर्ण होणार आहे, असं अमित शाह म्हणाले.

हेही वाचा – अयोध्येतील श्रीराम मंदिराचे काम 50 टक्के पूर्ण, ट्रस्टने दिली माहिती

- Advertisement -

तीन तलाख पद्धत बंद करण्याची मागणी करण्यात येत होती. आम्ही ही मागणी मान्य करून तीन तलाखसारखी प्रथा कायदेशीररित्या बंद केली. समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीलाही सुरुवात झाली आहे. जागतिक स्तरावर भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे. आपली अर्थव्यवस्था २०२६ पर्यंत तिसऱ्या क्रमांकावर येईल, असा अंदाज अनेक यंत्रणांनी व्यक्त केला आहे, असंही अमित शाह म्हणाले.

भारताला सुरक्षित बनवण्याचं आश्वासन आम्ही दिलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सीमांना सुरक्षित केलं आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळापेक्षा सध्या भारताच्या सर्व सीमा सुरक्षित आहेत. तसंच, अतंर्गत सुरक्षाही मजबूत करण्यात आली आहे. याची जाणीव संपूर्ण जगाला आहे, असंही अमित शहांनी स्पष्ट केलं.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -