घरदेश-विदेशपोलंडमध्ये पडली रशियाची क्षेपणास्त्र; बायडेन यांनी तातडीने बोलावली G7 देशांची बैठक

पोलंडमध्ये पडली रशियाची क्षेपणास्त्र; बायडेन यांनी तातडीने बोलावली G7 देशांची बैठक

Subscribe

रशियाने युक्रेनवर डागलेली क्षेपणास्त्रे पोलंडमध्ये पडली असून यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत पोलंड सरकारने रशियाच्या राजदूताला समन्स बजावला आहे. पोलंड परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लुकाझ जसिना यांनी एका निवेदनात सादर केले असून ज्यात या घटनेबाबत त्वरित तपशीलवार स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी बुधवारी सकाळी इंडोनेशियामध्ये G7 आणि NATO सदस्य देशांची तातडीने बैठक बोलावली आहे.

या बैठकीत नाटोचे सदस्य देश पोलंडमधील रशियन क्षेपणास्त्र हल्ल्याबाबत चर्चा होईल. पोलंडमध्ये रशियन क्षेपणास्त्र हल्ल्याची बातमी समजताच बायडेन यांनी तात्काळ पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डुडा यांची भेट घेत जीवित व मालमत्ता हानीबाबत तीव्र शोक व्यक्त केला. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी पोलंडला अमेरिकेचा पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

- Advertisement -

बायडेन यांनी नाटो संघटनेशी अमेरिकेच्या दृढ वचनबद्धतीचे पुष्टी केली. या प्रकरणाच्या चौकशीत पोलंडला अमेरिकेचे समर्थन आणि मदत करण्याचे वचन दिले. पोलंडमध्ये क्षेपणास्त्र पडल्यानंतर G7 नेत्यांनी आपत्कालीन बैठकीवर सहमती दर्शवली आहे.

या घटनेवर बायडेन म्हणाले की, पूर्व पोलंडमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल मी तीव्र शोक व्यक्त करण्यासाठी पोलंडचे अध्यक्ष आंद्रेज डुडा यांच्याशी बोललो आणि पोलंडच्या स्फोटाच्या तपासासाठी माझा पूर्ण पाठिंबा दिला. याबाबत पोलंड सरकार काय निर्णय घेणार त्या निर्णयाबाबत त्यांच्या संपर्कात राहू, पोलंडमध्ये क्षेपणास्त्रे कोणी डागले, याबाबत कोणताही ठोस पुरावा नसल्याचे पोलंडचे राष्ट्राध्यक्ष डुडा यांनी म्हटले आहे. आता या घटनेच्या तपासात अमेरिकेतील तज्ज्ञही सहभागी होणार आहेत.

- Advertisement -

पोलंड मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, 15 नोव्हेंबर 2022 रोजी रशियाने युक्रेनमध्ये जोरदार बॉम्ब हल्ला केला. सोमवारी पहाटे 3:40 च्या सुमारास लुब्लिन प्रांतातील हुबिसझो जिल्ह्यातील प्रीझवोडो गावात रशियन बनावटीचे क्षेपणास्त्र पडले, त्यात दोन लोक ठार झाले. त्यामुळे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रोफेसर झिबिग्न्यू राऊ यांनी पोलंडमधील रशियन राजदूतांना बोलावून तत्काळ तपशीलवार निवेदन देण्याची मागणी केली आहे.


मुंबईतील पुलांची कामे टोलवाटोलवी आणि संथगतीच्या विळख्यात!


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -