घरदेश-विदेशकोण आहेत सचिन पायलट?

कोण आहेत सचिन पायलट?

Subscribe

राजस्थानमध्ये आता सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी जोर धरताना दिसत आहे.

राजस्थामध्ये काँग्रेस सत्तेच्या जवळ जाताना दिसत आहे. त्यानंतर आता सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी जोर धरताना दिसत आहे. शिवाय, राजस्थानमध्ये काँग्रेसनं बहुमत प्राप्त केल्यास सचिन पायलट यांना मुख्यमंत्री केली जाण्याची शक्यता आहे.

कोण आहेत सचिन पायलट?

काँग्रेसचे लोकप्रिय नेते राजेंद्र पायलट यांचे सचिन पायलट हे चिरंजीव आहेत. सचिन यांचा जन्म ७ सप्टेंबर १९७७ रोजी झाला. राजेश पायलट यांनी केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी देखील पार पाडली होती. वयाच्या ५५व्या वर्षी कार अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. पायलट कुटुंबिय हे मुळचे उत्तरप्रदेशमधील वेदपुरा या गावचे आहेत. सचिन यांचं शिक्षण नवी दिल्लीतील एअरफोर्स बाल भारती विद्यालयात झालं. त्यानंतर त्यांनी सेंट स्टिफेंस कॉलेज आणि अमेरिकेतील पेंसिलवेनिया विद्यापीठात आपलं शिक्षण पूर्ण केलं. वयाच्या २६व्या वर्षी सचिन पायलट यांनी चौदाव्या लोकसभेसाठी दौसामधून निवडणूक लढवली. खासदार झाल्यानंतर सचिन यांनी त्यावेळी सर्वात तरूण खासदार होण्याचा मान देखील मिळवला. २००९ साली देखील सचिन पायलट यांनी अजमेरमधून लोकसभेची निवडणूक लढवली. २०१४ साली त्यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देखील पार पाडली होती.

- Advertisement -

२००४ मध्ये सचिन पायलट यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांची मुलगी सारा अब्दुल्लाह यांच्याशी विवाह केला. सचिन – सारा यांना आरान आणि वेहान अशी दोन मुलं आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -