घरदेश-विदेश'केवळ दोनच लोक सरकार का चालवतात?'; काँग्रेसचा शाहांवर पलटवार

‘केवळ दोनच लोक सरकार का चालवतात?’; काँग्रेसचा शाहांवर पलटवार

Subscribe

गुरू आणि साथीदारांना जबरदस्तीने सेवानिवृत्त करुन अपमान केला त्यांनी स्वत:चं आत्मपरिक्षण करावं

आणीबाणी घोषणेच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त गृहमंत्री अमित शहा यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. अमित शाह यांना प्रत्युत्तर देताना कॉंग्रेसने भारतीय जनता पक्षाला, स्वतःला प्रश्न विचारण्यास सांगितले आहेत. केवळ दोन लोकच सरकार का चालवतात आणि इतरांना का बाजूला सारलं गेलं? असे सवाल कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केले आहेत.

रणदीप सुरजेवाला यांनी गुरुवारी ट्विट करत भाजपवर पलटवार केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “देशाचा सत्ताधारी पक्ष असल्याने भाजपने स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत. बहुमतासह सत्तेत बसलेल्या सरकारमध्ये केवळ दोनच लोकच सरकार का चालवतात? उर्वरित लोकांना का बाजूला सारलं गेलं? नेहरू-गांधींचा तुम्हाला तिरस्कार का आहे?” असे प्रश्न त्यांनी भाजप आणि अमित शाहांना विचारले आहेत.

- Advertisement -

प्रश्न त्यांना पण विचारायला हवा ज्यांनी आपल्या गुरू आणि साथीदारांना जबरदस्तीने सेवानिवृत्त करुन अपमान केला आहे. लालकृष्ण अडवाणी, एमएम जोशी, केशुभाई पटेल, कलराज मिश्रा, सुषमा स्वराज, हरेन पंड्या, संजय जोशी … ही यादी खूप लांब आहे.

- Advertisement -

हेही वाचा – एमडी, एमएसच्या परीक्षा पुढे ढकला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोदींना पत्र


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -