घर देश-विदेश सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्मवर अश्लीलता रोखण्यासाठी नियम बनवणार? केंद्राने उच्च न्यायालयात काय...

सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्मवर अश्लीलता रोखण्यासाठी नियम बनवणार? केंद्राने उच्च न्यायालयात काय म्हटले?

Subscribe

नवी दिल्ली : सोशल मीडिया (Social Media) आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर (Ott Platform) अश्लील भाषा आणि कंटेट असणारे व्हिडीओ सर्रास अपलोड केले जातात. मात्र आता यावर बंदी येणार आहे. या दोन्ही प्लॅटफॉर्मवर अश्लीलता रोखण्यासाठी नियम केले जातील, असे केंद्राने दिल्ली उच्च न्यायालयाला (Delhi High Court) सांगितले आहे. (Will make rules to prevent obscenity on social media OTT platforms What did the Center say in the High Court)

दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्राच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले की, उच्च न्यायालयाने मागील आदेशांमध्ये  सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अश्लीलतेसंबंधी दर्शविलेल्या चिंतेची दखल घेण्यात आली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर अश्लील मजकूर रोखण्यासाठी नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येतील.

- Advertisement -

हेही वाचा – Chandrayaan-3 वेळेआधीच उतरणार चंद्रावर; इस्रोने ट्वीट करत दिली माहिती

न्यायालयाने काय म्हटले होते?

न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी 17 ऑगस्ट रोजी दिलेल्या निकालात म्हटले होते की, सार्वजनिक आणि अल्पवयीन मुलांसाठी खुले असलेल्या सोशल मीडिया आणि ओटीट प्लॅटफॉर्मवर अश्लील भाषेचा वापर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले होते. त्यानंतर केंद्र सरकारने सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने हे प्रकरण निकाली काढले आहे. यावेळी न्यायालयाने म्हटले की, केंद्राचे प्रतिज्ञापत्रात मागील आदेशांचे पुरेसे पालन करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Mizoram Railway Bridge Collapsed : 17 जणांचा मृत्यू; 35 ते 40 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

TVFच्या वेब सीरिजवर न्यायालयाने दर्शविला होता आक्षेप

द व्हायरल फीव्हर म्हणजेच TVF च्या कॉलेज रोमान्स या वेब सीरिजमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेवर उच्च न्यायालयाने आक्षेप दर्शविला आहे. अश्लील भाषेचा वापर महिलांना अपमानित करतो. तसेच या अशा भाषेमुळे महिला स्वत: पीडित वाटू शकते, असे उच्च न्यायालयाचे मत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल 6 मार्चच्या अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट (ACMM) च्या आदेशाला कायम ठेवताना आला आहे. ज्यांनी दिल्ली पोलिसांना टीव्हीएफ शोचे दिग्दर्शक सिमरप्रीत सिंग आणि अभिनेत्री अपूर्वा अरोरा यांच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले होते.

- Advertisment -