घरक्राइममाजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

Subscribe

माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आणि अँटिलिया बाँम्ब प्रकरणात दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या दोन्ही प्रकरणांमध्ये त्यांना जामीन मंजूर केला आहे.

मुंबई : माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आणि अँटिलिया बाँम्ब प्रकरणात दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या दोन्ही प्रकरणांमध्ये त्यांना जामीन मंजूर केला असून प्रदीप शर्मा यांना मोठा दिलासा दिला आहे. याआधी या प्रकरणांमध्ये जामीन मिळावा, यासाठी शर्मा यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. परंतु न्यायालयाकडून हा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. याआधी देखील प्रदीप शर्मा यांना तीन आठवड्यांचा अंतरिम जामीन देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा सरेंडर केले होते. त्यामुळे याच कारणास्तव आता सुप्रीम कोर्टाने नियमित जामीन मंजूर केला आहे. (Ex-police officer Pradeep Sharma granted bail by Supreme Court)

हेही वाचा – कोणत्याही राज्याच्या विशेष दर्जाला हात लावणार नाही; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात ग्वाही

- Advertisement -

व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येत सचिन वाझे यांना मदत केल्याचा आरोप प्रदीप शर्मा यांच्यावर करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेकडून या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. परंतु या प्रकरणी करण्यात आलेले आरोप प्रदीप शर्मा यांच्याकडून फेटाळून लावण्यात आले होते. तर त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत, असा दावा देखील त्यांच्याकडून करण्यात आला होता. परंतु प्रदीप शर्मा हेच मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत, असा आरोप एनआयएकडून ठामपणे करण्यात आला होता.

काय आहे प्रकरण?

- Advertisement -

25 फेब्रुवारी 2021 रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या बंगल्याच्या बाहेर स्फोटकांनी भरलेले SUV हे वाहन सापडले होते. ज्यानंतर एकच खळबळ उडाली होती. ही कार ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांची माहिती समोर आल्यानंतर काहीच दिवसांत म्हणजेच 5 मार्च 2021 ला त्यांचा मृतदेह आढळून आला. ज्यानंतर या प्रकणरमू तपास करत असताना प्रदीप शर्मा दोषी आढळून आले होते.

यानंतर या प्रकरणाबाबत माहिती देताना राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सांगण्यात आले होते की, मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा यांचाही हात होता. अंबानी कुटुंबासह इतरांना धमकावण्याचा जो कट रचण्यात आला होता. या कटाची संपूर्ण माहिती मनसुख हिरेन यांना माहित असल्याने त्यांची हत्या करण्यात आली. मनसुख हिरेन यांना अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेल्या कारबाबत संपूर्ण माहिती होती. तसेच, आरोपी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांना मनसुख हिरेन यांच्यामार्फत केलेल्या कृत्याचा पर्दाफाश होण्याची भिती होती, त्यामुळेच हिरेन यांच्या हत्येचा कट रचण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -