घरताज्या घडामोडीCorona Injection : कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार उघड; महिलेला अटक

Corona Injection : कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार उघड; महिलेला अटक

Subscribe

कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. तर दुसरीकडे या कोरोना विषाणूच्या नावाखाली लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. कोरोना साथीच्या आजारामुळे घाबरलेल्या रुग्णांच्या मन: स्थितीचा फायदा घेत कोविडवरील इंजेक्शनचा काळा बाजार जोरात सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) उल्हासनगरमध्ये कारवाई करत एका महिलेला अटक करण्यात आली आहे. नीता पंजवानी असे आरोपीचे नाव आहे.

असा करत होती काळाबाजार

सिपला कंपनीचे टोसीलीझुमॅब हे इंजेक्शन काळ्या बाजारात विकत असल्याचे उघड झाले आहे. सुमारे ४० हजार ५४५ रुपयाचे इंजेक्शन ती ६० हजार रुपयांना विकत असताना एफडीएच्या (FDA) अधिकाऱ्यांनी तिला रंगेहाथ पकडले आहे. या इंजेक्शनसाठी गरजूंची प्रचंड आर्थिक लूट करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा मुंबई गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने नुकताच पर्दाफाश केला होता. या प्रकरणी सात जणांच्या टोळीला अटक करण्यात आली होती आणि त्यांच्याकडून काळ्या बाजारात विक्रीसाठी साठा करून ठेवलेली १२ रेमडेसिवीर इंजेक्शन हस्तगत करण्यात आली आहेत. ५ हजार ४०० रुपये किमतीचे इंजेक्शन ही टोळी ३० हजार रुपयांना विकत होती. तर पोलीस आणि एफडीएच्या धडक कारवाईनंतरही औषधांचा काळाबाजार सुरूच आहे. हे उल्हासनगरमधील महिलेच्या अटकेवरून पुन्हा एकदा उघड झालं आहे.

- Advertisement -

सहआयुक्त विराज पौणिकर, सहाय्यक आयुक्त प्रवीण पवार, व्हिजिलन्सचे सह आयुक्त सुनील भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली निशिगंधा पाष्टे, नितीन आहेर आणि संदीप नरावणे या औषध निरीक्षकांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – “कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांना मिळणार १ लाखाची आर्थिक मदत”

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -