घरदेश-विदेश"कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांना मिळणार १ लाखाची आर्थिक मदत"

“कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांना मिळणार १ लाखाची आर्थिक मदत”

Subscribe

पाँडेचरीचे (Puducherry) मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी (V Narayanasamy) यांनी गुरुवारी विधानसभेत केले जाहीर

पाँडेचरीचे (Puducherry) मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी (V Narayanasamy) यांनी गुरुवारी विधानसभेत जाहीर केले की कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबियांना मुख्यमंत्री मदत निधीतून एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, कोरोना संसर्गातून बरे होण्याचे प्रमाण आता ६३.१८ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर आतापर्यंत ७ लाख ८२ हजार ६०६ रूग्ण बरे झाले आहेत. सध्या ३ लाख ५६ हजार ४३९ रुग्ण कोरोना संक्रमित आहेत. तसेच देशात कोरोनाचा संसर्ग झालेला आकडा १२ लाख ३८ हजार ६३५ वर गेला आहे.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, समन्वित प्रयत्नांमुळे मृत्यू दर कमी पातळीवर राहण्यास मदत झाली आहे. तो दर सध्या २.४१ टक्के आहे. तर गेल्या २४ तासांत १ हजार १२९ लोकांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २९ हजार ८६१ वर पोहोचली आहे.

आयसीएमआर अधिकाऱ्यांनी सांगितले की, २२ जुलैपर्यंत १ कोटी ५० लाख ७५ हजार ३६९ नमुन्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून बुधवारी ३ लाख ५० हजार ८२३ नमुन्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, बुधवारपर्यंत तीन दिवसांत १० लाख नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे.


Coronavirus Maharashtra: राज्यात २४ तासांत तब्बल ९८९५ नवे रूग्ण; २९८ मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -