घरCORONA UPDATEFloodInChina : कोरोनानंतर चीनमध्ये पुराचे संकट; जनजीवन विस्कळीत

FloodInChina : कोरोनानंतर चीनमध्ये पुराचे संकट; जनजीवन विस्कळीत

Subscribe

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावानंतर आता चीनमध्ये पुराने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशातील अनेक शहरांमध्ये गावच्या गावं पाण्याखाली गेली अशी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. चीनमध्ये पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून घरे, रस्त्यावरील गाड्या सगळेच पाण्याखाली गेले आहेत. प्रामुख्याने वुहान, हुबेईसारख्या राज्यांमध्ये पुराने हाहाःकार माजवला आहे.

चीनच्या राष्ट्रीय हवामान उपग्रह केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, देशातील सर्वात मोठ्या जलशयाचा साठा असलेल्या पोयांग या धरणाचा बांध तुटला असून यामुळे पाण्याची पातळी मर्यादेपेक्षा जास्त वाढल्याचे स्पष्ट होत आहे. या आठवड्याच्या सुरूवातीला संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगितले की, ३३ नद्यांच्या पातळीत विक्रमी वाढ झाली आहे. चीनमधील पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले असून मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटेनत १४० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहितीही मिळत आहे. मात्र अद्याप याला चीन सरकारने दुजोरा दिलेला नाही. दरम्यान, पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

चीनच्या पूरस्थितीचे छायाचित्र –

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -