घरदेश-विदेशतुमचा अली, तर आमचा बजरंगबली - योगी आदित्यनाथ

तुमचा अली, तर आमचा बजरंगबली – योगी आदित्यनाथ

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यातच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठे विधान केले आहे. मायावती मुस्लिमांकडे मते मागत आहेत. गठबंधनसाठी फक्त मतदान करा आणि स्वतःचे मत दुसर्‍या कोणाला जाऊ देऊ नका, असे त्या सांगत आहेत.

त्यामुळे हिंदूंकडे आता भाजपशिवाय कोणताही पर्याय नाही. तसेच तुमचा अली, तर आमचा बजरंगबली असेही ते सपा-बसपा महागठबंधनला उद्देशून म्हणाले आहेत. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी बहुजन समाज पक्षावर आणि समाजवादी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच दलित आणि मुस्लीम कधीही एकत्र येऊ शकत नाहीत. कारण फाळणीदरम्यान दलितांबरोबर पाकिस्तानने कशा पद्धतीचा व्यवहार केला आहे, हे अख्ख्या जगाला माहीत आहे.

- Advertisement -

भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मोठे दलित नेते झाले. परंतु योगेश मंडल फाळणीदरम्यान पाकिस्तानात गेले होते. योगेश मंडल यांनी पाकिस्तानात दलितांवर होत असलेला अत्याचार पाहिल्यानंतर ते पुन्हा भारतात परतले. महागठबंधनने मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. राहुल गांधी अमेठी सोडून वायनाडला जाण्याचे कारण हे मुस्लीम मते आहेत,अशी टीका योगी यांनी काँग्रेसवर केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -