घरदेश-विदेश'या' मोदी समर्थकाने छातीवर कोरले 'मोदी' नाव; रक्तबंबाळ फोटो व्हायरल

‘या’ मोदी समर्थकाने छातीवर कोरले ‘मोदी’ नाव; रक्तबंबाळ फोटो व्हायरल

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदी समर्थक प्रचंड खुश झाले आहेत. बिहारच्या एका मोदी समर्थकाने या आनंदाच्या भरात स्वत:च्या छातीवर चाकूने 'मोदी' नाव कोरले आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यामुळे भाजप समर्थक प्रचंड खुश झाले आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही मोदी समर्थकांनी मिठाई वाटली. तर काहींनी वेगळ्या पद्धतीने आनंद साजरा केला. दरम्यान, बिहारच्या मोतिहार जिल्ह्यातील एका मोदी समर्थकाने आपल्या छातीवर मोदी नाव कोरले आहे. त्याने कोरलेले नावासकट त्याचा रक्तबंबाळ फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

‘मोदींसाठी जीव देखील देईल’

छातीवर मोदींचे नाव कोरणाऱ्या या तरुणाचे नाव सोनू पटेल असे आहे. तो बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातील तुरकौलिया गावाचा नागरिक आहे. २३ मे रोजी जेव्हा मतमोजनी सुरु झाली तेव्हापासून सोनू प्रचंड खुश होता. त्याने दुपार पासून मिठाई वाटायला सुरुवात केली. त्यानंतर तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने चक्क स्वत:च्या छातीवर चाकूने ‘मोदी’ असे नाव कोरले. यासंदर्भात त्याला प्रश्न विचारला असता तो म्हणाला, ‘मोदी फक्त माझेच नाही. तर देशाचे भविष्य आहेत. जर मोदी देशासाठी बलिदान देऊ शकतात, तर मी देखील त्यांच्यासाठी जीव देऊ शकतो.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -