घरदेश-विदेशऑनलाईन जेवण मागवताय?,तुमचा डिलीव्हरी बॉय असे तर करत नाही ना?

ऑनलाईन जेवण मागवताय?,तुमचा डिलीव्हरी बॉय असे तर करत नाही ना?

Subscribe

झोमॅटो कंपनीला या संदर्भातील व्हिडिओ पाठवल्यानंतर त्यांनी याची जबाबदारी स्विकारली आहे. या पुढे असा प्रकार घडू नये म्हणून विशेष काळजी घेण्यात येईल,असे देखील कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

ऑनलाईन वेबसाईटवरुन हल्ली जेवण सर्रास मागवले जाते. वेबसाईटवरील पदार्थांच्या फोटोमुळे तर भूक जास्तच वाढते. पण तुमच्यापर्यंत तो पदार्थ येईपर्यंत त्याच्यासोबत काय होते याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? नसेल केला तर हा व्हायरल व्हिडिओ पाहा आणि मग ठरवा तुम्हाला येणाऱ्या जेवणासोबत असे तर होत नाही ना ?

काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये?

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये झोमॅटो या ऑनलाईन कंपनीचा डिलीव्हरी बॉय त्याच्या स्कुटीवर बसून खात आहे. आता खातोय म्हणजे तो डिलीव्हरीसाठी आणलेल्या पदार्थांचे बॉक्स उघडून त्यातून खात आहे. विशेष म्हणजे तो एकाच बॉक्समधील पदार्थ खात नाही. तर आणलेल्या पदार्थांमधील दोन बॉक्स उघडून त्याच्या जवळील चमच्याने पदार्थ खातो आणि कोणी त्यातील खाल्ले असे वाटू नये म्हणून चमच्याने तो पदार्थ नीट देखील करतो. कळस म्हणजे खाऊन झाल्यानंतर तो ते सगळं अगदी हॉटेलने पार्सल केल्याप्रमाणे पुन्हा पॅक करतो. त्याच्याजवळ असलेली झोमॅटोची चिकटपट्टी पिशवीला लावून स्कुटी घेऊन निघून जातो. तब्बल २ मिनिटांचा हा व्हिडिओ आहे.

- Advertisement -
हे माहीत आहे का? –सौंदर्य प्रसाधन विक्रेत्यांना नोंदणी बंधनकारक

पाहा व्हिडिओ ? 

काय म्हणाले झोमॅटो?

झोमॅटो कंपनीला या संदर्भातील व्हिडिओ पाठवल्यानंतर त्यांनी याची जबाबदारी स्विकारली आहे. या पुढे असा प्रकार घडू नये म्हणून विशेष काळजी घेण्यात येईल. पदार्थांना वेगळ्या प्रकारचे सील लावण्यात येईल. जेणेकरुन तो पदार्थ ग्राहकांपर्यंत नीट पोहोचेल. पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओची सत्यता कंपनीने पडताळले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. पण काळजी घेऊ,असे आश्वासन ग्राहकांना दिले आहे.

- Advertisement -
वाचा- रासायनिक आईस्क्रिम बनवणाऱ्या कारखान्यांवर एफडीएची कारवाई

 एफडीने आधीही केली होती कारवाई 

अन्न प्रशासन आणि सुरक्षा (FDA)ने देखील या आधी ऑनलाईन जेवण पुरवणाऱ्या वेबसाईटवरील हॉटेलांवर छापे टाकले होते. त्यात झोमॅटो, स्विगी, उबर इटस या  वेबसाईटवर असलेल्या हॉटेलमधील स्वच्छता पाहता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. अत्यंत अस्वच्छ वातावरणात या ठिकाणी जेवण बनवले जात होते. त्यामुळेच एफडीएने ही कारवाई केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -