घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धामूर्ती विक्रीतून कारागृहाला ९ लाखांचा महसूल

मूर्ती विक्रीतून कारागृहाला ९ लाखांचा महसूल

Subscribe

नाशिक : नाशिक कारागृहातील कैद्यांनी बनविलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना भाविकांची पसंती मिळाली. सुमारे 545 गणेशमूर्ती विकल्या गेल्याने, त्यातुन कारागृहाच्या महसूलात ९ लाख १२ हजार रुपयांच्या निधीची भर पडली आहे. विशेष म्हणजे कैद्यांनी बनवलेली लालबागच्या राजाची मूर्ती राजभवनातदेखील विराजमान झाली होती.

दरवर्षी कारागृहातील कैदी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारत असतात. कारागृहाबाहेरच्या प्रगती विक्री केंद्र येथे गणेशमूर्ती विक्रीकरिता ठेवण्यात आल्या होत्या. गणेशमूर्ती घेण्यासाठी ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती. यंदा 2022 मध्ये कैद्यांनी सुमारे 560 गणेशमूर्ती साकारण्यात आल्या होत्या. त्यात विविध प्रकारच्या अत्यंत सुबक व आकर्षक गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या होत्या. 12 कैद्यांनी तीन महिने काम करत या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केल्या होत्या. यावर्षी तयार करण्यात आलेल्या 560 पैकी 545 शाडू मातीच्या गणेशमूर्ती विक्री झाली असून, शासनाला त्यातून ९ लाख १२ हजार रुपये महसूल प्राप्त झाला. ५६० गणेशमूर्ती तयार करण्याकरिता चार लाख 12 हजार खर्च आला होता.

- Advertisement -

येरवडातील कर्मचार्‍यांनाही दिले प्रशिक्षण

प्रथमच येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनीही सुमारे 265 गणेशमूर्ती तयार केल्या होत्या. येरवडा कारागृहात या कैद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी नाशिक कारागृहातील दोन प्रशिक्षित कैदी दोन महिन्यांपूर्वी येतात. 265 गणेशमूर्तींपैकी सुमारे 122 मूर्तींची विक्री होऊन 1.36 लाख रुपयांची कमाई झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -