घरक्राइमकौटुंबिक वादातून डॉक्टरची आत्महत्या

कौटुंबिक वादातून डॉक्टरची आत्महत्या

Subscribe

नाशिक : पंचवटीतील चिंचबनमधील राहत्या घरी डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.५) सकाळी 9.30 वाजेदरम्यान घडली. पती-पत्नीतील कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. निलेशकुमार पोपटलाल छाजेड (वय ४८, रा. ०३, धात्रक संकुल, चिंचबन, मालेगाव स्टॅन्डजवळ, पंचवटी) असे मृत डॉक्टरचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. छाजेड हेे पंचवटीतील सुयोग हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. सोमवारी (दि. 5) सकाळी साडेसात वाजता छाजेड यांनी घरी असताना स्वत:ला गळफास लावून घेतला. ही घटना उघडकीस येताच नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. डॉ. छाजेड यांचे कौटुंबिक वाद सुरु होते. त्यातून त्यांनी आत्महत्या केली, असा संशय पंचवटी पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -