घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाझाडांची कत्तल रोखणारा शैलेंद्र आपटे यांचा बाप्पा

झाडांची कत्तल रोखणारा शैलेंद्र आपटे यांचा बाप्पा

Subscribe

पुण्यातील कर्वेनगर भागात राहणारे शैलेंद्र आपटे हे मागील अनेक दशकांपासून घरात गणेशोत्सव साजरा करत आहेत. गेल्या ४ वर्षांपासून त्यांनी इको फ्रेंडली पद्धतीने सण साजरा करायला सुरुवात केली. यावर्षी आपटे यांनी आपल्या घरगुती गणपतीच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा असा संदेश दिला आहे. झाडांची बेसुमार कत्तल होत असल्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. आपटे यांनी आपल्या घरातील बाप्पा कापलेल्या झाडाच्या ओडंक्यावर बसवला आहे. शेषनागाने बाप्पाला वेटोळे घातले असून यापुढे झाडांची कत्तल करु नका, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.

आपटे यांनी १३ इंच उंचीची शाडूची मुर्ती आणली आहे. सजावटीसाठी सुद्धा कागद, पुठ्ठा अशा इको फ्रेंडली वस्तू वापरण्यात आल्या आहेत. आपटे परिवारातील जवळपास १० सदस्य चार आठवडे या सजावट आणि त्यामागील संदेश पोहोचवण्यासाठी मेहनत घेत होते. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आता सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे या माध्यमातून आपटे परिवाराने दाखवून दिले आहे.

- Advertisement -

स्पर्धकाचे नाव – शैलेंद्र आपटे

पत्ता – A2/703, Suvarnaratna Gardens Society,
Cummins College Road, Karvenagar,
Pune – 411052

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -