घरसंपादकीयदिन विशेषगणितज्ज्ञ शकुंतला देवी

गणितज्ज्ञ शकुंतला देवी

Subscribe

शकुंतला देवी यांचा आज स्मृतिदिन. शकुंतला देवी यांना ह्यूमन कॉम्प्युटर म्हणून ओळखले जाते. तसेच त्या गणितज्ज्ञ होत्या. त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२९ रोजी बंगलोरमध्ये झाला. शकुंतला देवींचे वडील सर्कसमध्ये काम करायचे.

शकुंतला देवी तीन वर्षांच्या असताना त्यांना पत्त्यांचे खेळ शिकवताना त्यांच्या अफाट स्मरणशक्तीचे ज्ञान वडिलांना झाले. सर्कस सोडून ते शकुंतला यांचेच रोडशो करू लागले. वयाच्या ६व्या वर्षी शकुंतला यांनी म्हैसूर विद्यापीठात आपल्या अंकगणितीय कौशल्याचे प्रदर्शन केले.

- Advertisement -

शकुंतला देवी १९४४ मध्ये लंडनला गेल्या. लंडनला गेल्यावर पुढे त्यांनी संपूर्ण जगामध्ये प्रवास केला आणि आपल्या बुद्धिमत्ता आणि गणितीय कौशल्याचे वेगवेगळे चमत्कार दाखवून त्यांनी संपूर्ण जगाला चक्रावून सोडले. १९७६ मध्ये आपल्या अमेरिका दौर्‍यात त्यांनी संगणकापेक्षा अधिक वेगाने आकडेमोड पूर्ण करून त्याची उत्तरे परीक्षकांसमोर अचूक सादर केली. १९७७ मध्ये डलास विद्यापीठात शकुंतला यांचा मुकाबला तत्कालीन सर्वात जलद कॉम्प्युटर ‘युनिव्हॅक’शी झाला.

तेथे शकुंतला देवी यांनी एका २०१ अंकी संख्येचे २३ वे मूळ ५० सेकंदात काढले व फळ्यावर लिहिले. हे मूळ काढायला कॉम्प्युटरला ६२ सेकंद लागले. १८ जून १९८० मध्ये त्यांना ७६८६३६९७७४८७० आणि २४६५०९९७४५७७९ या दोन संख्या गुणाकारासाठी देण्यात आल्या. शकुंतला देवी यांनी या दोन आकड्यांचा अचूक गुणाकार करून दाखवत केवळ २८ सेकंदांमध्ये उत्तर दिले आणि शकुंतला देवी यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये विराजमान झाले. अशा या महान गणितज्ज्ञाचे २१ एप्रिल २०१३ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -