घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तो कर्मेंद्रियें कर्मीं । राहटतां तरी न नियमी । परी तेथिचेनि ऊर्मी । झांकोळेना ॥
कर्मेंद्रियाकडून कर्मे होत असताना तो त्यांना आवरीत नाही.
तो कामनामात्रें न घेपे । मोहमळें न लिंपे । जैसें जळीं जळें न शिंपे । पद्मपत्र ॥
पण त्यांच्या विकारांच्या आधीन होत नाही. तो वासनेने आकळला जात नाही व त्याच्या मनाला मोहाची बाधा होत नाही. कमळाचे पान जसे रात्रंदिवस पाण्यात असून पाण्याने भिजत नाही,
तैसा संसर्गामाजि असे । सकळांसारिखा दिसे । जैसें तोयसंगें आभासे । भानुबिंब ॥
त्याप्रमाणे, संसारामध्ये राहून तो इतरांसारखा दिसतो. ज्याप्रमाणे पाण्याच्या संगतीने सूर्यबिंब पाण्यात दिसते,
तैसा सामान्यत्वें पाहिजे । तरी साधारणुचि देखिजे । येरवीं निर्धारितां नेणिजे । सोय जयाची ॥
त्याप्रमाणे वरकांती पाहता तो मनुष्य साधारणतः दिसतो; बाकी निश्चयाने त्याची आत्मस्थिती ओळखता येत नाही.
ऐशा चिन्हीं चिन्हितु । देखसी तोचि मुक्तु । आशापाशरहितु । वोळख पां ॥
अशा गुणांनी जो युक्त असेल व जो निरिच्छ असेल, तोच योगी, तोच मुक्त, असे तू समज.
अर्जुना तोचि योगी । विशेषिजे जो जगीं । म्हणौनि ऐसा होय यालागीं । म्हणिपे तूतें ॥
अर्जुना, तोच योगी व तोच जगात स्तुतीस पात्र असतो. म्हणून तू असा हो, असे मी तुला म्हणतो.
तूं मानसा नियमु करीं । निश्चळु होय अंतरीं । मग कर्मेंद्रियें व्यापारीं । वर्ततु सुखें ॥
तू आपल्या मनाला आवरून धर व अंतर्यामी स्थिरबुद्धि हो. (मग) कर्मेंद्रिये खुशाल आपापले व्यापार करोत.
म्हणौनि नैष्कर्म्य होआवें । तरी एथ तें न संभवें । आणि निषिद्ध केवीं राहाटावें । विचारीं पां? ॥
म्हणून कर्मरहित होणे हे या संसारात शक्य नाही. मग शास्त्रविरुद्ध आचरण का करावे, याचा विचार कर.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -