घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जया सुखाचिया गोडी । मन आर्तीची सेचि सोडी । संसाराचिया तोंडीं । गुंतलें जें ॥
ज्या ब्रह्मसुखाच्या गोडीने संसारात गुंतलेले मन इच्छेची आठवणच सोडते,
जें योगाची बरव । संतोषाची राणीव । ज्ञानाची जाणीव । जयालागीं ॥
जे योगाची शोभा, संतोषाचे फक्त राज्य आणि ज्याच्याकरिता ज्ञानाची आवश्यकता,
तें अभ्यासिलेनि योगें । सावयव देखावें लागे । देखिलें तरी आंगें । होईजेल गा ॥
ते ब्रह्मसुख अभ्यासाचे योगाने मूर्तिमंत दिसू लागते, आणि ते सुख पाहणारा तद्रूपच होतो.
तरी तोचि योगु बापा । एके परी आहे सोपा । जरी पुत्रशोकु संकल्पा । दाखविजे ॥
तथापि, अर्जुना, एकापरी हा योग सोपा आहे; संकल्पाचे पुत्र जे कामक्रोधादिक, त्यांचा नाश केल्यामुळे त्या संकल्पाला जेव्हा पुत्रशोक होईल, तेव्हाच तो साध्य होतो !
हा विषयातें निमालिया आइके । इंद्रियें नेमाचिया धारणीं देखे । तरी हियें घालूनि मुके । जीवित्वासी ॥
विषय लोप पावले असे या संकल्पाने ऐकिले व इंद्रिये नियमितपणाने वागतात असे पाहिले, म्हणजे याची छाती फुटुन जाऊन हा जिवाला मुकतो.
ऐसें वैराग्य हें करी । तरी संकल्पाची सरे वारी । सुखें धृतीचिया धवळारीं । बुद्धि नांदे ॥
अशा रीतीने वैराग्य प्राप्त झाल्यावर संकल्पाच्या यात्रा संपतात, आणि धैर्याच्या मंदिरात बुद्धि ही सुखाने निवास करिते.
बुद्धी धैर्या होय वसौटा । तरी मनातें अनुभवाचिया वाटा । हळु हळु करी प्रतिष्ठा आत्मभुवनीं ॥
बुद्धीला धैर्याचा आश्रय मिळाला, म्हणजे मग ती मनाला हळू हळू ब्रह्मानुभवाच्या वाटेला लावून त्याची ब्रह्मस्वरूपी स्थापना करिते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -