घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

याही एके परी । प्राप्ति आहे विचारीं । हें न ठके तरी सोपारी । आणिक ऐकें ॥
या एका मार्गाने ब्रह्मप्राप्ती होते आणि हेही होत नसल्यास याहीपेक्षा सुलभ असा दुसरा एक मार्ग सांगतो, ऐक.
आतां नियमुचि हा एकला । जीवें करावा आपुला । जैसा कृतनिश्चयाचिया बोला । बाहेरा नोहे ॥
साधकाने आपला असा एक नियम करावा की, एकदा केलेला निश्चय कधीही टाळावयाचा नाही.
जरी येतुलेनि चित्त स्थिरावें । तरी काजा आलें स्वभावें । नाहीं तरी घालावें । मोकलुनी ॥
अशा निश्चयाने जर मन स्थिर झाले, तर अनायासेच काम झाले; पण असे जर न होईल, तर त्या चित्ताला खुशाल स्वैर वागू द्यावे.
मग मोकलिलें जेथ जाईल । तेथूनि नियमूचि घेऊनि येईल । ऐसेनि स्थैर्यचि होईल । सावियाचि कीं ॥
मग ते मोकळे सुटल्यावर जेथे जाईल तेथून निश्चय त्याला परत घेऊन येईल आणि अशा रीतीने ते तत्काळ स्थिर होऊन राहील.
पाठीं केतुलेनि एके वेळे । तया स्थैर्याचेनि मेळें । आत्मस्वरूपाजवळें । येईल सहजें ॥
नंतर अशाप्रकारे अनेक वेळा स्थिर राहण्याने ते सहज आत्मस्वरूपाजवळ येईल;
तयातें देखोनि आंगा घडेल । तेथ अद्वैतीं द्वैत बुडेल । आणि ऐक्यतेजें उघडेल । त्रैलोक्य हें ॥
आणि मनाने त्या आत्मस्वरूपास पाहिल्यावर ते मन स्वत: आत्मरूप बनून जाईल. तेव्हा या अद्वैत स्वरूपात द्वैत नाहीसे होईल आणि नंतर सर्व त्रैलोक्य ऐक्याच्या तेजाने प्रकाशित होईल.
आकाशीं दिसे दुसरें । तें अभ्र जैं विरे । तैं गगनचि कां भरे । विश्व जैसें ॥
आकाशामध्ये निराळे दिसणारे जे मेघ, ते नाहीसे झाल्यावर ज्याप्रमाणे संपूर्ण विश्व पोकळीनेच भरलेले असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -