घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

स्वरूप तरी देखे । आळविलें आइके । शब्दु बोले मुखें । परी ज्ञान नाहीं ॥
समोर मनुष्य आले असता त्याला दिसते, कोणी हाक मारली असता ऐकू येते व तो स्वतः बोलतो; परंतु त्या त्या क्रियेचे त्याला भान नसते. (चित्त जाग्यावर नसते.)
हें असो काजेंविण । जें जें कांहीं करण । तें केवळ कर्म जाण । इंद्रियांचें ॥
असो; तत्त्वार्थ काय की, निष्कारण जे काही करणे, ते फल इंद्रियांचेच कर्म होय, असे समज.
मग सर्वत्र जें जाणतें । तें बुद्धीचें कर्म निरुतें । ओळख अर्जुनातें । म्हणे हरी ॥
श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, या व्यतिरिक्त सर्व जाणून जे कर्म करणे, ते बुद्धीचे कर्म असे समज.
ते बुद्धि धुरे करुनी । कर्म करिती चित्त देऊनी । परी ते नैष्कर्म्यापासुनी । मुक्त दिसती ॥
ते योगी बुद्धीला पुढे करून मनापासून कर्माचे आचरण करितात; परंतु ते कर्मातीत ब्रह्मभावाच्याही पलीकडे असून मुक्त आहेत.
जे बुद्धीचिये ठावूनि देहीं । तयां अहंकाराची सेचि नाहीं । म्हणौनि कर्म करितां पाहीं । चोखाळले ॥
कारण बुद्धीपासून देहापर्यंत त्यांना अहंकाराची आठवणसुद्धा होत नाही. म्हणून ते कर्म करीत असले तरी शुद्ध होत.
अगा करितेनवीण कर्म । तेंचि तें नैष्कर्म्य । हें जाणती सुवर्म । गुरुगम्य जें ॥
‘कर्म करणारा मी आहे’ असा भाव न ठेवता जे कर्म करणे, तेच नैष्कर्म्य होय, हे गुरूपासून कळणारे तत्त्व ते जाणतात.
आतां शांतरसाचें भरितें । सांडीत आहे पात्रातें । जे बोलणें बोलापरौतें । बोलवलें ॥
आम्ही आता जे शब्दांनी प्रतिपादन करता येणार नाही ते बोललो, म्हणून शांतिरस इतका अधिक झाला की, तो ज्या पात्रात भरला आहे, ते पात्र भरून तो खाली सांडत आहे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -