घरताज्या घडामोडी'लाल सिंग चढ्ढा'साठी आमिरचे तीन वेगवेगळे भन्नाट लूक

‘लाल सिंग चढ्ढा’साठी आमिरचे तीन वेगवेगळे भन्नाट लूक

Subscribe

आपल्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टबरोबर आपल्या चाहत्यांसाठी सतत काहीतरी वेगळे घेऊन येण्यासाठी धडपडणारा अभिनेता म्हणजे अर्थात आमिर खान. चित्रपटातील भूमिका खास ठरावी यासाठी या अभिनेत्याला एका अवतारातून दुसऱ्या अवतारात शिरताना सगळ्यांनीच पाहिले आहे. त्यासाठी कधी त्याने पगडीबरोबर लांब दाढी धारण केली तर कधी खुल्या केसांबरोबर दाढी, कधी क्रू कट लूक तर कधी आणखी काही. आता आपला आगामी चित्रपट लाल सिंग चढ्ढासाठी देखील तो असेच काहीतरी हटके प्रयोग करताना दिसून येणार आहे.

- Advertisement -

या चित्रपटासाठी लांब दाढी ठेवल्यानंतर आता तो अलिकडेच क्लीन शेव लूक मध्ये दिसून आला. आता तो पंजाबमध्ये चित्रपटाचे शूटींग सुरू करणार आहे. आमिरच्या सरदारच्या लूक बरोबरच त्याच्या लांब दाढीतील लूकचीही प्रशंसा होत आहे. इंटरनेटपासून चाहत्यांपर्यंत या लूकने सर्वांचीच मने जिंकून घेतली आहेत. आता क्लीन शेवसह आमिरचा एक नवा लूक समोर आला आहे. या लूकमुळे या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता अधिकच वाढली आहे. लाल सिंग चढ्ढा या चित्रपटाचा लेखक अतुल कुलकर्णी असून अद्वैत चंदन दिग्दर्शन करत आहे. वायकॉम १८ स्टुडिओज व आमिर खान प्रोडक्शनद्वारे निर्मिती खाली हा चित्रपट तयार होत आहे. यंदा ख्रिसमसच्या मुहुर्तावर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.


हेही वाचा – Video: ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या सेटवर धामणचा धुमाकूळ

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -