घरताज्या घडामोडीरवीना टंडणने पार पाडली जबाबदारी, वडिलांवर केले अंत्यसंस्कार

रवीना टंडणने पार पाडली जबाबदारी, वडिलांवर केले अंत्यसंस्कार

Subscribe

रवीनाने एका मुलाप्रमाणे जबाबादारी हाती घेऊन वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

Mumbai : अभिनेत्री रवीना टंडण पितृशोकात आहे. रवीनाच्या वडिलांचे आज ११ फेब्रुवारीला वयाच्या ८७व्या वर्षी निधन झाले. वडिलांच्या जाण्याने रवीना पूर्णपणे कोलमडून गेली आहे. सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून रवीनाने वडिलांच्या निधनाची माहिती दिली. रवीना रवी टंडण यांची एकूलती एक मुलगी होती. त्यांच्या निधनानंतर रवीनाने मुलीची जबाबदारी पाडत वडिलांवर अंत्यसंस्कार केले. रवीना अंत्यसंस्कारावेळी पार बिथरलेल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -

वडिलांच्या अंत्यविधीवेळीचे रवीनाचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात रवीना वडिलांना शेवटचा निरोप देताना दिसत आहे. वडिलांचे पार्थिव अॅम्बुलन्समधून स्मशानभूमीत आणताना गाडीत शांत, निशब्द झालेली रवीना पाहायला मिळाली. रवीनाने एका मुलाप्रमाणे जबाबादारी हाती घेऊन वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Filmfare (@filmfare)

- Advertisement -

रवीनाच्या पितृशोकात अनेक बॉलिवूड कलाकार तिच्या सांत्वनासाठी आले होते. रवी टंडण यांच्या अंत्यसंस्कारावेळी अभिनेत्री सुचित्र पिल्लई, फराह खान, रिध्दिमा पंडित हे कलाकार उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

वडिलांच्या निधनानंतर रवीनाने एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने म्हटलेय, ‘पप्पा तुम्ही नेहमी माझ्यासोबत राहाल. मी नेहमी तुझ्यासारखाच राहीन. मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. लव्ह यू बाबा’

रवी टंडन हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. नजराना, मुकद्दर, मजबूर और निर्माण असे अनेक चित्रपट त्यांनी केले. अनहोनी आणि एक मैं और एक तू या चित्रपटांची निर्मितीही केली. रवी टंडनने पत्नी वीणासोबत लग्न केले. या लग्नापासून त्यांना राजीव नावाचा मुलगा झाला. राजीव दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहेत. यासोबतच त्यांना रवीना टंडन ही मुलगी होती, तिचे नाव रवी आणि वीणा टंडन यांच्या नावाने जोडले गेले.  Raveena Tandon चे वडील रवी टंडन यांचे निधन; अभिनेत्री म्हणाली, तुम्ही कायम…


हेही वाचा –  Raveena Tandon चे वडील रवी टंडन यांचे निधन; अभिनेत्री म्हणाली, तुम्ही कायम…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -