घररायगडग्रामपंचायत स्तरावर होणार पाणी पुरवठा,स्वच्छता समितीचे गठण

ग्रामपंचायत स्तरावर होणार पाणी पुरवठा,स्वच्छता समितीचे गठण

Subscribe

जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक न जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत वैयक्तिक शौचालय, संस्थात्मक शौचालय यांचे बांधकाम व वापर याबरोबरच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे करावयाची आहेत.

जल जीवन मिशनची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व मिशन अधिक परिणामकारक होण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर पाणीपुरवठा व स्वच्छता समितीची स्थापना करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची स्थापना करण्यात यावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांनी दिल्या आहेत.

जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक न जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत वैयक्तिक शौचालय, संस्थात्मक शौचालय यांचे बांधकाम व वापर याबरोबरच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे करावयाची आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती स्थापन करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ४९ नुसार बनवलेली ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती ही ग्रामपंचायतीची उपसमिती आहे. पाणी व स्वच्छता प्रकल्पाची आखणी, नियोजन, अंमलबजावणी व देखभाल दुरुस्ती करणेची जबाबदारी पाणीपुरवठा व स्वच्छता समितीची असल्याची माहिती, डॉ. किरण पाटील व डॉ. ज्ञानदा पन्हे यांनी दिली आहे.

- Advertisement -

समितीची रचना

– या समितीचे अध्यक्ष अध्यक्ष सरपंच व सचिव ग्रामसेवक असतील

- Advertisement -

– पाणी पुरवठा व स्वच्छता या समितीमध्ये किमान १२ सदस्य व जास्तीत जास्त २४ सदस्य असतील

– समितीमधील एक तृतीयांश सदस्य ग्रामपंचायत सदस्यातून निवडलेले असतील

– या समितीत ५० टक्के महिला सदस्यांचा समावेश

– गावपातळीवरील महिला मंडळ, युवा मंडळ, भजनीमंडळ, महिला बचतगट सहकारीसंस्था इ. प्रतिनिधी

– ग्रामस्तरीय शासकीय, जि.पं. ग्रामपंचायत कर्मचारी आमंत्रित व सहकारी सदस्य म्हणून निवड करता येईल. त्यांना मतदानाचा अधिकार नसेल.

– मागासवर्गीय समाजास योग्य प्रतिनिधित्व असावे.

– प्रत्येकवॉर्ड किंवा वस्तीतील किमान प्रतिनिधी सदस्य म्हणून असतील.

समितीची कर्तव्ये

– गावातील सर्व कुटुंबाना प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे किमान ५५ लिटर प्रती दिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे

– पाणी पुरवठा योजनेचा गाव कृती आराखडा तयार करणे. गावातील पाणीपुरवठा व स्वच्छता सुविधांचे नियोजन रचना, संकल्पना, अंमलबजावणी व देखभाल दुरुस्ती करणे

– पेयजल व स्वच्छतेबाबतच्या समस्यांचा आढावा घेणेच्या दृष्टीने ग्रामपंचायतीस वस्तुस्थितीदर्शक माहिती देणे

– गावाचा पेयजल सुरक्षा आराखडा तयार करणे

– पाणी पुरवठा योजनेच्या सर्व टप्प्यात व निर्णय प्रक्रियेत लोकसहभागाची खात्री करणे तसेच लोक वर्गणी (आर्थिक/ श्रमदान स्वरुपात) देण्याबाबत गावकर्‍यांना प्रोत्साहित करणे

– योजनेसाठी प्राप्त निधी बँक खात्यात जमा करून त्यांचे व्यवस्थापन करणे

– पूर्ण झालेल्या योजना कार्यान्वित करून त्यांचे दायित्व स्वीकारणे

– पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाणी पट्टी व अनामत रक्कम आकारणी व वसुली करणे

– कुटुंब कल्याण व पोषण कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे

– त्रयस्थ संस्थेकडून होणार्‍या योजनेच्या तपासणी व कार्यक्षमता मुल्यांकनाची व्यवस्था करणे

– योजनांचे सामाजिक लेखा परीक्षण हाती घेणे

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -