घरमनोरंजनप्रियाच्या गळ्यातही आहे जादू!

प्रियाच्या गळ्यातही आहे जादू!

Subscribe

अभिनेत्री प्रिया बापटने सोशलमिडीयावर तिच्या चाहत्यांसाठी एक व्हीडीओ शेअर केला आहे. गणपतीच्या निमित्ताने प्रियाने एक गाणं गायलं आहे. प्रियाच्या अभिनयाप्रमाणेच तीच्या आवाजाची भुरळ प्रेक्षकांवर पडली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत उत्तम अभिनेत्रींची नावं घेतली तर त्यात अभिनेत्री प्रिया बापटचं नावं आग्रहाने घेतलं जातं. प्रियाने बालकलाकार म्हणून या कलाक्षेत्रात प्रवेश केला, आणि एकसे एक मराठी चित्रपटात, मालिकांमध्ये कामं करून प्रेक्षकांची मनं जिंकली. काकस्पर्श या चित्रपटातील प्रियाच्या अभिनयाचं कौतूक सगळ्यांनीच केलं. प्रिया नेहमी सोशलमिडीयावर सक्रिय असते. आपल्या फोटोंच्या व्हीडीओच्या माध्यमातून ती आपल्या नवीन प्रोजेक्टबद्दल, आपल्या आवडीबद्दल चाहत्यांना  माहिती देत असते. असाच एक व्हीडीओ प्रियाने गणेशोत्सवानिमित्त शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

@Regrann from @umesh.kamat – गणपती स्पेशल..खास लोकाग्रहास्तव.? @priyabapat

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

 

View this post on Instagram

 

गणपती special ?

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

- Advertisement -


या व्हीडीओमध्ये प्रिया गाणं म्हणत आहे. या व्हीडीओच्या निमित्ताने प्रिया किती सुंदर गाते, तीची गायन कला तीच्या चाहत्यांसमोर आली आहे. ‘शुक्रतारा मंद वारा…’,’दो नैना और….’ अशी गाणी प्रियाने गायली आहेत. ही गाणी गाऊन प्रियाने गाण्यातून गणपतीची सेवा केली आहे.

प्रियाच्या अभिनयावर तीचे चाहते खूष होतेच. पण या व्हीडीओमुळे प्रियाच्या गाण्याच्या प्रेमात तीचे चाहते पडले आहेत. तीच्या या व्हीडीओवर चाहत्यांनी खूप चांगल्या कमेंट्स केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -