घरमनोरंजनरिंकूची स्वारी लंडनच्या दारी

रिंकूची स्वारी लंडनच्या दारी

Subscribe

महाराष्ट्राची लाडकी आर्ची म्हणजेच आपली रिंकू राजगुरू तिच्या फोटोंनी चाहत्यांना घायाळ करत आहे. सैराट, कागर, मेकअप अशा दर्जेदार सिनेमा नंतर रिंकु आता नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाच्या शुटींगसाठी रिंकु थेट लंडनमध्ये पोहचली आहे. तिच्या लंडन प्रवासाचे फोटो तीने तिच्या सोशल मीडियावरून शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

Life is a balance of holding on and letting go🦋🤗 PC:@ganesh_phuke Makeup:@ksameerramesh Hair:@wadkeuma

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

- Advertisement -

रिंकू राजगुरू तिचा आगामी सिनेमा ‘छूमंतर’ च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. शुटींगदरम्यानचे व्हिडीओ आणि फोटोस रिंकु आपल्या सोशल मीडियावरून शेअर करत आहे. शुटींग सोबतच लंडनचा प्रवासही एन्जॉय करताना दिसत आहे. रिंकुचा मॉर्डन लुक तिच्या चाहत्यांना खुपच आवडला आहे. रिंकुच्या व्हिडीओ आणि फोटोज वर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. तिच्या आगामी सिनेमासाठी आणि पुढच्या प्रवासासाठी तिला शुभेच्छा ही दिल्या आहेत. रिंकु सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. यावेळी मात्र रिंकूने तिच्या मॉडेल लुकने चाहत्यांना घायाळ केलं आहे. रिंकूने ग्रे कलरचे फुल हाताचे टिशर्ट, गळ्यात मफलर घातला आहे. तसेच ‘ऑलवेज वेअर युअर इनविझिबल क्राऊन’ असं म्हणत रिंकुने तिचा साडीतला व्हिडीओ ही शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

Always wear your invisible crown👸🍁#shootingtime🎬 #enjoyin.

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on


छूमंतर सिनेमाच्या शुटिंगच्या निमित्ताने रिंकु पहिल्यांदाच लंडनला गेली आहे.समीर जोशी हे या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. छूमंतर सिनेमात रिंकु सोबत अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि सुव्रत जोशी हे ही मुख्य भुमिकेत दिसणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -