घरताज्या घडामोडी'अग्गंबाई सासूबाई' मालिकेतील अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण

‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतील अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण

Subscribe

अग्गंबाई सासूबाई मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण झाली आहे.

‘आई माझी काळूबाई’ पाठोपाठ आता आणखी एका मराठी मालिकेतील कलाकाराला कोरोनाची लागण झाली आहे. अग्गंबाई सासूबाई मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. निवेदिता यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आल्याने त्यांनी स्वत:ला घरातच क्वारंटाईन केले आहे. तसेच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच सेटवरील सर्वांचीच कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

दरम्यान, अग्गंबाई सासूबाई मालिकेत महत्त्वाची व्यक्तीरेखा साकारणारे तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की, डॉ. गिरीश ओक यांच्यासह इतर कलाकारांची देखील कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. मात्र, त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

- Advertisement -

दोन दिवसांत शूटिंगला होईल सुरुवात

निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर १५ सप्टेंबरपासून मालिकेचे शूटिंग थांबवण्यात आले होते. मात्र, आता पुढील दोन दिवसांत शूटिंगला सुरुवात होईल. निवेदिता सराफ क्वारंटाइनमधून बाहेर आल्यानंतर शूटिंगसाठी उपस्थित राहतील. त्याचबरोबर मालिकेच्या सेटवरील सर्वांच्या सुरक्षेची योग्यरित्या काळजी घेतली जात असल्याचे देखील मालिकेच्या टीमकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

योग्य ती खबरदारी घेत मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. मात्र, तरी देखील सेटवर कोरोनाचा शिरकाव होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी आई माझी काळूबाई या मालिकेच्या सेटवर तब्बल २७ जणांना कोरोनाची लागण झाली होती. तर याच मालिकेत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

हेही वाचा – पाणी साचल्याने सुरक्षा रक्षक रहिवाशांसाठी धावले, त्यांची हाक मात्र लिफ्टमध्येच अडकली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -