घरमुंबईपाणी साचल्याने सुरक्षा रक्षक रहिवाशांसाठी धावले, त्यांची हाक मात्र लिफ्टमध्येच अडकली

पाणी साचल्याने सुरक्षा रक्षक रहिवाशांसाठी धावले, त्यांची हाक मात्र लिफ्टमध्येच अडकली

Subscribe

दोन सुरक्षा रक्षकांचा लिफ्टमध्ये दुर्दैवी मृत्यू

मुंबईत विक्रमी पावसाने शहर ठप्प करून टाकले आहे. जागोजागी पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पण एन पावसात पावसाचे पाणी बाहेर करण्यासाठी धडपड करणाऱ्या दोन सुरक्षा रक्षकांवरच काळाने घाला घालण्याचा प्रकार आज आग्रीपाडा येथे घडला. बिल्डिंगच्या बेसमेंटमधील साचलेले पाणी काढण्यासाठी त्यांनी हरप्रकारचा प्रयत्न केला, पण जेव्हा त्यांच्यावर मृत्यूचे संकट ओढावले तेव्हा त्यांची हाक कोणालाही एकायला आली नाही. बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने लिफ्टने जाऊ पाहणाऱ्या दोन्ही सुरक्षांचा लिफ्टमध्ये गुदमरून अंत झाला. जमीर अहमद सोहनन (वय 32 वर्ष), शेहजाद मोहम्मद सिद्दीकी मेमन (वय 37 वर्षे) अशी दोन्ही मृत रक्षकांची नावे आहेत.

आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास आग्रीपाडा येथील नाथानी रेसिडेन्सी या इमारतीत ही दुर्दैवी घटना घडली. या इमारतीमधील दोन सिक्युरिटी गार्ड बिल्डिंगचे बेसमेंट मध्ये पाणी चालू करण्यासाठी गेले होते. बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने ते लिफ्ट मध्ये चढले. त्यानंतर त्यांनी लिफ्टचे दरवाजे बंद झाले. परंतु ती लिफ्ट चालू झाली नाही व दरवाजे उघडले नाही. लिफ्ट उघडली नाही, त्यामुळे दोघांनीही लिफ्टचा अलार्म वाजवून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. पण तोवर या संपुर्ण पाण्याचा शिरकाव लिफ्टमध्येही व्हायला सुरूवात झाली. बेसमेंट पुर्णपणे भरल्यानंतर संपुर्ण लिफ्टमध्ये पाणी भरले. रहिवाशांनी अलार्म एकला आणि लिफ्टचा दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केले खरे. पण काही केल्यानेही लिफ्ट उघडेना. पाण्याचा लिफ्टमध्ये झालेला शिरकाव आणि सर्वच प्रयत्न व्यर्थ ठरल्यानंतर मात्र रहिवाशांनी रहिवाशांनी फायर ब्रिगेडला या घटनेची माहिती दिली. पण तोवर खूपच उशिर झाला होता. अग्निशमन दलाने येऊन लिफ्टची वरील बाजू कापून काढून दोन्ही सिक्युरिटीना बाहेर काढले खरे, पण तोवर त्यांनी जीव सोडला होता. लिफ्टमध्ये झालेल्या या दुर्दैवी घटनेबाबत अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -