घरताज्या घडामोडीसीरम इन्स्टिट्यूटने आणखी एका लसीवर केले काम सुरू, नाकावाटे दिला जाणार डोस

सीरम इन्स्टिट्यूटने आणखी एका लसीवर केले काम सुरू, नाकावाटे दिला जाणार डोस

Subscribe

कंपनी वर्षाच्या अखेरपर्यंत युकेमध्ये या लसीच्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरू करेल.

जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असून ३ कोटी १८ लाख पार झाला आहे. तसेच ९ लाख ७६ हजरांहून अधिक कोरोनाचे बळी गेले आहेत. त्यामुळे सध्या जगभरातील अनेक संशोधक कोरोनावरील लस तयार करत आहे. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक भारताची कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोरोनाच्या लसीच्या दिशेने सतत वाटचाल करत आहे. आता सीरम इन्स्टिट्यूटने अमेरिकेन बायोटेक कंपनी कोडजेनिक्स (Codagenix Inc) बरोबर कोरोनाच्या ज्या लसीसाठी करार केला होता, ती लस तयार करण्यास सुरुवात केली आहे. या लसीची खास गोष्ट म्हणजे ती नाकावाटे दिली जाणार आहे. कोडजेनिक्सने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे.

माहितीनुसार, या लसीचे नाव CDX-005 असे आहे. या लसीच्या कॅडिडेटने प्राण्यांवरील प्री-क्लिनिकल ट्रायल पूर्ण केले आहे. आता कंपनी या वर्षाच्या अखेरपर्यंत युकेमध्ये या लसीच्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरू करेल. प्री-क्लिनिकल ट्रायलमध्ये लसीचा चांगला परिणाम झाला असल्याचा कंपनीने दावा केला आहे.

- Advertisement -

कोडजेनिक्सचे सीईओ रॉबर्ट कोलमॅन म्हणाले की, ‘सीरम इन्स्टिट्यूटचे तांत्रिक आणि आर्थिक पाठबळ पाहता आम्हाला आशा आहे की, लसीची क्लिनिकल ट्रायल वर्ष संपण्याअगोदर पूर्ण होईल आणि लसीवर वेगवान पद्धतीने काम होईल.’

पुढे कोलमॅन म्हणाले की, ‘लस तयार करताना अशा सॉफ्टवेअर प्लेटफॉर्मचा वापर केला आहे, जो व्हायरस उत्परिवर्तन (म्यूटेशन) बघून SARS-CoV-2चा जीनोमाचा पुनर्वापर करतो. आता या लसीमध्ये सूक्ष्मजंतूविरूद्ध लढायची क्षमता नाही, तरीही ही शरीरात मजबूत टी सेल्स (T cell) आणि अँटीबॉडीज तयार करते. ही लस कोरोना व्हायरसच्या इतर लसीपेक्षा अगदी वेगळी आहे. सध्या तयार केल्या जाणार्‍या लसी एडिनोव्हायरस वेक्टरवर आधारित आहे आणि त्या फक्त स्पाइक प्रोटीनला टार्गेट करतात. तर CDX-005 लस वेगळ्या पद्धतीने काम करेल. ही इंजेक्शनऐवजी नाकाद्वारे दिली जाईल, जी अधिक प्रभावी ठरेल आणि यामुळे रुग्णांनाही मदत होईल.’

- Advertisement -

कोडजेनिक्स कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, लस तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटला भारतीय जैव तंत्रज्ञान विभाग (DBT) च्या आनुवंशिक हाताळणीसाठी आढावा समितीकडून आवश्यक नियामक मान्यता प्राप्त झाली आहे. कंपनीच्या वतीने असे म्हटले जाते की, सीरम इन्स्टिट्यूट जगभरातील लस उपलब्ध करून तयारी करण्याव्यतिरिक्त देखील लसीची सुरक्षा आणि परिणामकारकतेचा अभ्यास करेल.

कोडजेनिक्स लस कार्यक्रमात गुंतवणूक करणारी कंपनी Adjuvant Capital या कंपनीची मॅनेजिंग पार्टनर ग्लेन रॉकमॅन म्हणाल्या, ‘लसीमध्ये वापरल्या गेलेल्या सॉफ्टवेअरमुळे कोडजेनिक्स केवळ सर्वात प्रभावीच नाही, तर सध्याच्या लसीमध्ये आणि भविष्यातील इतर साथीच्या रोगांवर परिणामकारक ठरणार आहे.’ कोडजेनिक्स ही क्लिनिकल स्टेज सिंथेटिक बायोलॉजी कंपनी आहे, जी व्हायरसच्या जीनोमाचा रिकोडिंगवर कार्य करते. सीरम इन्स्टिट्यूटने कोडाजेनिक्स लस व्यतिरिक्त ऑक्सफोर्ड लसीची भागीदार देखील आहे आणि त्या लसीच्या क्लिनिकल ट्रायल कार्यरत आहे.


हेही वाचा – पुणे शहर पोलीस दलात कोरोनाचे थैमान; १,१५० जणांना कोरोनाची लागण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -