घरमनोरंजनअक्षय कुमारने अमित शहांना दिला 'हा' सल्ला!

अक्षय कुमारने अमित शहांना दिला ‘हा’ सल्ला!

Subscribe

अक्षयला गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी कोणता प्रश्न आहे का? असा सवाल करण्यात आला. यावर त्याने कोणताही प्रश्न न सांगता त्यांना एक सल्ला दिला आहे.

चित्रपट अभिनेता अक्षय कुमार याने गृहमंत्री अमित शाह यांच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर अक्षयने अमित शहा यांना आरोग्यविषयक सल्ला सुद्धा दिला आहे. अमित शहा यांना ६.३० वाजल्यानंतर काहीही न खाण्याचा सल्ला त्याने दिला आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखती दरम्यान अक्षय कुमारला पंतप्रधान यांच्यासोबतच्या मुलाखतीच्या अनुभवावर प्रश्न विचारण्यात आले. यावेळी अक्षयला गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी कोणता प्रश्न आहे का? असा सवाल करण्यात आला. यावर त्याने कोणताही प्रश्न न सांगता त्यांना एक सल्ला दिला आहे.

- Advertisement -

याविषयी विचारल्यानंतर अक्षयकुमारने सांगितले की, “मी अमित शहांना केवळ हेच सांगेन की कृपया आपल्या प्रकृतिची काळजी घ्या. ते देशाचे एक महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत. मी त्यांना सायंकाळी ६.३० नंतर काहीही न खाण्याचा सल्ला देईन.” अक्षय कुमार पुढे म्हणाला की, “आपल्या शास्त्रांमध्ये सुद्धा सूर्यास्तानंतर काहीही न खाण्यासंबंधी सांगितले आहे. हे शारीरिक स्वास्थ्यासाठी लाभदायक असल्याचे देखील म्हटले आहे. तेव्हा अमित शहा यांनीच नव्हे तर सर्वांनी सायंकाळी ६.३० म्हणजेच सूर्यास्तानंतर काहीही खाऊ नये.”

- Advertisement -

दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखती दरम्यान अक्षयने पंतप्रधान मोदींना अनेक प्रश्न विचारले होते. पंतप्रधान मोदी यांना कधी राग येतो का? तुम्हाला आंबा आवडतो का? यासारख्या प्रश्नांचा समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा अक्षय कुमारच्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिली होती.

हेही वाचा – महिलांना लुबाडणार स्वतःच अडकला पोलिसांच्या हनी ट्रॅपमध्ये!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -