घरताज्या घडामोडी'शिवसेनेकडून जीवाला धोका'; किरीट सोमय्यांचे राज्यपालांना पत्र

‘शिवसेनेकडून जीवाला धोका’; किरीट सोमय्यांचे राज्यपालांना पत्र

Subscribe

शिवसेनेकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्यांना धमकी आली का? या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर किरीट सोमय्या यांनी दिले नाही. 'काही गोष्टी पोलिसांपुरत्याच मर्यादित राहाव्यात', अशी प्रतिक्रिया त्यांनी यावर दिली.

‘शिवसेनेकडून आपल्या जीवाला धोका आहे’, अशा आशयाचे पत्र भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठवले आहे. ‘आपल्यावर शिवसेनेकडून हल्ला होऊ शकतो’, असे सोमय्या यांनी म्हटले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांनी राज्यपाल आणि गृहसचिव यांना पत्र पाठवले आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. मात्र, शिवसेनेकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्यांना धमकी आली का? या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर त्यांनी दिलेले नाही. काही गोष्टी पोलिसांपुरत्याच मर्यादित राहाव्यात असे ते यावर म्हणाले.


हेही वाचा – ॲन्टॉप हिल हत्याप्रकरण : कोणालाही पाठीशी न घालण्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन

- Advertisement -

काय म्हणाले किरीट सोमय्या?

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत शिवसेनेवर टीका केली. ‘किरीट सोमय्याला कधी भीती वाटली नाही आणि वाटणारही नाही. एवढे घोटाळे काढले, एवढ्या लोकांना जेलमध्ये टाकले, विषय भीतीचा नाही. इथे असे आही की, सत्तेवर आल्याबरोबर दादागिरी आणि धमक्या दिल्या जातात. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेच्या दोन गटांमध्ये लोक आले होते आणि त्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी काही जण जखमी झाले होते. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये चार दिवस उपचार केला गेला. तुम्ही सत्तेत आल्याबद्दल कामांना स्थगिती द्या, कंत्राटदारांना बोलवा, ते आम्ही लोकशाही पद्धतीने उचलू. दोन वर्षांपूर्वी झालेला हल्ला लक्षात घेऊन पत्र पाठवले. अशाप्रकारच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. परंतु, यांची अरेरावी रेकॉर्डवर आली पाहिजे. म्हणून मी राज्यपालांना कळवले’, असे किरीट सोमय्या म्हणाले.


हेही वाचा – गुंडाचे बादशहा शरद पवार; फडणवीसांकडून ‘सामना’चे दाखले

- Advertisement -

सोमय्या आणि शिवसेना यांच्यातील वाद

मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळेला किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या नेतृत्वावर टीका केली होती. शिवसेनवर टीका करताना काही आक्षेपार्ह शब्द देखील त्यांच्याकडून वापरले गेले होते. या टीकेमुळेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यास विरोध केला होता. त्यामुळे किरीट सोमय्या यांची पुन्हा एकदा खासदार बनण्याची संधी हुकली. किरीट सोमय्या यांनी त्यावेळी शिवसेनेची मनधरणी करण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट नाकारली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -