घरमनोरंजनयुट्यूबवर अक्षयच्या 'फिलहाल2' गाण्याचा टीजर ठरला सुपरहिट

युट्यूबवर अक्षयच्या ‘फिलहाल2’ गाण्याचा टीजर ठरला सुपरहिट

Subscribe

गेल्या वेळेस अक्षयच्या 'फिलहाल' या गाण्याने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती याचा दुसरा भाग चाहत्यांना कितपत आवडतो हे पाहणे रंजक ठऱणार आहे.

 

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar)आणि नुपूर सेनन (Nupur Sanon) यांचा म्यूझिक व्हिडिओ ‘फिलहाल 2′(Filhaal2)गाण्याचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. अक्षयने सोशल मीडिया अकांउटवर गण्याचा टीजर शेअर करत लिहले आहे की,” फिलहाल प्रेम करण्याची वेळ जवळ आली आहे. ‘फिलहाल 2’ प्रेम गीत 6 जुलैला रिलीज होणार आहे.तोपर्यंत तुम्ही टिजर एंजॉय करा.” ‘फिलहाल’ या म्युझिक अल्बम साँगला चाहत्यांची प्रचंड पसंती मिळाली होती. टीजरमध्ये अक्षय कुमार त्याच्या प्रेयसीच्या लग्नात नाचताना दिसत आहे. या सुंदर लव्ह साँगला बी प्राक यांने गायले आहे. ‘फिलहाल2’ चा पहिला भाग 2019 साली रिलीज करण्यात आला होता आणि या नंतर प्रेक्षकांनी या गाण्याला चांगलीच पसंती देत हे गाण चार्टबस्टर हिट केलं होतं. टीजरमधील गाण्याच्या काही ओळी  ऐकूण चाहते एकदमच भावूक झाले आहेत. टीजरमध्ये फक्त एक लाइन ऐकायला मिळत आहे- ‘एक बात बताओ तो…’ 51 सेकंदाच्या या टीजरने सोशल मीडियावर धमाका उडवून दिला आहे. आत्तापर्यंत टीजरला लाखो व्ह्यूव आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

- Advertisement -

वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास अभिनेता अक्षय कुमार सध्या प्रचंड व्यस्त आहे. अक्षयच्या अनेक चित्रपटाचे शूटींग पेंडीग आहेत. बच्चन पांडे,पृथ्वीराज,सुर्यवंशम,रक्षा बंधन,बेल बॉटम,अतरंगी रे अशा अनेक सिनेमाद्वारे अक्षय मनोरंजनाची मेजवानी चाहत्यांना देणार आहे. गेल्या वेळेस अक्षयच्या ‘फिलहाल’ या गाण्याने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती याचा दुसरा भाग चाहत्यांना कितपत आवडतो हे पाहणे रंजक ठऱणार आहे.

- Advertisement -


हे हि वाचा – …आणि कोर्टातच झाला डिंपलचा हॅप्पी बर्थडे



 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -