घरमनोरंजनबिग बींचा बहुचर्चित 'चेहरे' २७ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस

बिग बींचा बहुचर्चित ‘चेहरे’ २७ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस

Subscribe

कोरोनाचे निर्बंध शिथील होताच बॉलिवूड चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या नव्या तारखा रिलीज झाल्या आहेत. यात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या बहुचर्चित ‘चेहरे’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच ‘चेहरे’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलर पाहताच चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता पाहायला मिळत आहे. यानंतर नुकतचं अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाची नवी रिलीज डेट जाहीर केली आहे.

बिग बींनी  ‘चेहरे चित्रपट २७ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे’ अशी कॅप्शन देत एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘चेहरे’ हा चित्रपट ९ एप्रिल २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. मात्र कोरोना परिस्थिती पाहता चित्रपटाच्या प्रदर्शनाची ताऱीख पुढे ढकलण्यात आली. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख चाहत्यांसमोर आली आहे.

- Advertisement -

‘चेहरे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रुमी जाफरी यांनी केले आहे. बिग बींसह  इमरान हाश्मी रघुबीर यादव आणि सिद्धांत कपूर अशी कलाकारांची मोठी फौज चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तसेच क्रिस्टल डीसूजासोबत रिया चक्रवर्ती देखील चित्रपटात झळकणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची अधिक चर्चा होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन एका वरिष्ठ क्रिमिनल वकिलाची भूमिका साकारत आहेत.


दुसऱ्यांना शिकवतेस स्वतः काय करतेस? कंगनाच्या बोल्ड फोटोंवर नेटकऱ्यांचा संताप

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -