घरमनोरंजनबिग बींच्या हस्ते अवीच्या 'मैं हुआ तेरा' गाण्याचे अनावरण!

बिग बींच्या हस्ते अवीच्या ‘मैं हुआ तेरा’ गाण्याचे अनावरण!

Subscribe

अवीतेश उर्फ अवीच्या 'मैं हुआ तेरा' हे पहिल्या- वहिल्या गाण्याचे अनावरण झाले आहे. बीग बी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते या गाण्याचे अनावर करण्यात आहे.

संगीतकार आदेश श्रीवास्तव आणि अभिनेत्री विजयता पंडित यांचा सुपुत्र अवीतेश श्रीवास्तवने संगीत क्षेत्रात पदार्पण केले आहे. अवीतेश उर्फ अवीच्या ‘मैं हुआ तेरा’ हे पहिल्या- वहिल्या गाण्याचे अनावरण झाले आहे. बीग बी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते या गाण्याचे अनावर करण्यात आहे. दोन वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते ज्योर्जियो तुइन्फोर्ट यांच्या सहकार्याने हे गाणं तयार करण्यात आले आहे. तंसच हे गाणे रेमो डी’सुझा यांनी दिग्दर्शित केले आहे. या गाण्याचे अनावकर जगविख्यात अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अंधेरीतील कोर्टयार्ड बाय मॅरीएट येथे करण्यात आले.

संगीत कलेचे घडवले दर्शन

लॉस एंजल्समधील हॉलीवूड अकादमीचा विद्यार्थी, अवी याने शुजीत सरकारच्या ‘पिकू’ आणि ‘रंगून’ चित्रपटात विशाल भारद्वाजला सहकार्य करुन आपल्या कलेचे दर्शन घडविले होते. त्याने अमिताभ बच्चन यांच्या ‘जिंदगी’ चित्रपटाचे ‘आज की बात है’ हे शीर्षक गीत फक्त संगीतबद्धच केले नाही, तर ‘वन फॉर द वर्ल्ड’ मधे एकॉन आणि आदेश श्रीवास्तव यांच्यासोबत ‘प्रदर्शन’ देखील केले. अवीने ग्लोबल साउंड ऑफ पीस या अल्बम शिवाय टी-पेन व फ्रेंच मोंटानसह संगीत कला सादर केलेली आहे.

- Advertisement -

चित्रपटांच्या मिळाल्या ऑफर्स

हा माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे. माझे वडील या दिवसाची खूप वाट पाहत होते असे अवितेशने सांगितले. अवितेशला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या आहेत. मात्र अजून चित्रपटात जाण्याचा विचार करत आहे. मी माझ्या चित्रपटासाठी अभिनेता म्हणून योग्य ब्रेक शोधत असल्याचे मत त्याने मांडले आहे. यापुढे पुरस्कार विजेते संगीतकार तसेच वाद्य प्रतिभा असलेले आंतरराष्ट्रीय एकल यांच्या सह काम करण्याकडे कल देत असल्याचे मत अविने व्यक्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -