घरमनोरंजनअंकिताला आजही येते सुशांतची आठवण,व्हिडिओ शेअर करत दिला आठवणींना उजाळा!

अंकिताला आजही येते सुशांतची आठवण,व्हिडिओ शेअर करत दिला आठवणींना उजाळा!

Subscribe

अंकिता आणि सुशांतची भेट पहिल्यांदा एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' मालिकेच्या सेट वर झाली होती. आणि काही दिवसातच दोघही एकमेकांच्या प्रेमात पडले. सहा वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी 2016 मध्ये ब्रेकअप करण्याच्या निर्णय घेतला होता.

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande)आणि सुशांत सिंग राजपूत यांच्यातील प्रेम संबंध काही लपून नव्हते. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे त्यांनी स्वत:कबुल केले होते. मात्र काही व्यक्तीगत कारणांमुळे दोघांचाही ब्रेकअप झाला. यानंतर सुशांतच्या अचानक जाण्याने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. सुशांतने जगाचा निरोप घेऊन आता काही दिवसातच एक वर्ष पूर्ण होईल. पण अंकिताच्या मनात सुशांतच्या आठवणी अजूनही कायम आहे असे तिने नुकतच सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्ट वरुन  दिसून येत आहे. अंकिताने सुशांत सोबतचा एक व्हिडिओ इंस्टा स्टोरीवर शेअर केला आहे. दोघांनीही लोकप्रिय मालिका ‘पवित्र रिश्ता’ (Pavitra Rishta)यात  एकत्र काम केलं होतं. ही मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड गाजली होती. या मालिकेतून दोघेही प्रेक्षकांच्या घरोघरी पोहोचले होते त्यांना ओळख मिळाली. अंकिताने इंस्टास्टोरीवर मालिकेमधील दोन मोनोक्रोमॅटिक फॅन एडिटेड व्हिडिओ पोस्ट केले आहेत. तसेच यात  ‘परिणीता’ चित्रपटातिल प्रसिद्ध गाण ‘पीयू बोले पिया बोले’ या गाण्यासोबत व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच व्हिडिओमध्ये अंकिता अर्चनाच्या भूमिकेत कधी इमोशनल तर कधी रोमॅंटिक अंदाजात दिसत आहे.

- Advertisement -

अंकिता आणि सुशांतची भेट पहिल्यांदा एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ मालिकेच्या सेट वर झाली होती. आणि काही दिवसातच दोघही एकमेकांच्या प्रेमात पडले. सहा वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी 2016 मध्ये ब्रेकअप करण्याच्या निर्णय घेतला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिताने अनेकदा सोशल मीडिया तसेच माध्यमांवर त्याच्या विषयी अनेकदा चर्चा केली आहे.
सध्या अंकिता आणि  विक्की जैन  रिलेशनशिपमध्ये आहेत. अंकिता नेहमी विक्की सोबत सोशल मीडियावर फोटो  शेअर करते. सुशांतच्या मृत्यूनंतर विक्की जैन सोबत रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे अंकिताला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.


हे हि वाचा – कारभारी सूर्यभानचे अल्लड ऐश्वर्यासह होणार शुभविवाह, या लग्नाला बायजींचा पुढाकार

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -