घरमनोरंजनआशा भोसले यांची यूट्यूबवर एंट्री

आशा भोसले यांची यूट्यूबवर एंट्री

Subscribe

आशा भोसले यांनी बुधवारी रात्री ९ वाजता स्वत: चं यूट्यूब चॅनेल लाँच केलं.

प्रख्यात गायिका आशा भोसले यांनी यूट्यूबवर एंट्री घेतली आहे. त्यांच्या नातीने त्यांना स्वतःचं यूट्यूब चॅनेल उघडण्यास प्रोत्साहित केलं, असं आशा भोसले यांनी सांगितलं. आशा भोसले यांनी बुधवारी रात्री ९ वाजता स्वत: चं यूट्यूब चॅनेल लाँच केलं. या संदर्भात त्या म्हणतात, “सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीप्रमाणे मीही घरात बंदिस्त आहे. घरी माझ्या नातवंडांबरोबर बसून इंटरनेटच्या जगात संवाद स्थापित करण्यासाठी त्यांची सर्व कौशल्ये पाहता, माझ्यासमोर एक नवीन जग उघडकीस आलं. ”

ज्येष्ठ गायिका पुढे म्हणतात, “अनेक वर्षांपासून लोकांनी मला माझे विचार, अनुभव आणि भावना सांगायला सांगितले, परंतु या सर्वांसाठी मला वेळ मिळाला नाही. आता मी घरी असताना, मी माझे ८६ वर्षांचे अनुभव सामायिक करण्याचं ठरवलं आहे. कदाचित त्या काही लोकांचे मनोरंजन करतील. ” या निर्णयासाठी त्या प्रामुख्याने त्यांची नात जानईच्या नावाचा उल्लेख करतात.

- Advertisement -

पुस्तकाऐवजी मी संवादाद्वारे जीवनाविषयी कथा सांगण्यास प्राधान्य देते. हे नवीन व्हिज्युअल युग आहे. इंटरनेटने आपले विचार सामायिक करण्याची आश्चर्यकारक शक्ती दिली आहे, असं देखील त्या म्हणाल्या.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -