घरमनोरंजनसविता भाभी चित्रपटातून गायब!

सविता भाभी चित्रपटातून गायब!

Subscribe

अश्लील उद्योग मित्र मंडळ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्या आधीच या चित्रपटाची खूप चर्चा रंगली. चित्रपटातील सविता भाभी या नावामुळे चर्चेत आला. पण आता ‘सविता भाभी’ हे नावच चित्रपटातून गायब होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा महाराष्ट्रभर रंगली आहे. काही दिवसांपूर्वी ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटाच्या टीमने हटके पद्धत वापरत चित्रपटाचं प्रमोशन केलं होतं. त्यानंतर ही सविता भाभी कोण अशी उत्सुकता निर्माण झाली. मात्र चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि सविता भाभी कोण हे समजले. मात्र आता या चित्रपटातील सविता भाभी या कॉमिक कॅरेक्टरवरुन वाद निर्माण झाला आहे. निलेश गुप्ता यांनी हे पात्र कॉमिक कॉपीराइट असल्याचं सांगत चित्रपटाच्या टीमला कायदेशीर नोटीस पाठविली होती. त्यानुसार तब्बल 58 ठिकाणी ‘सविता भाभी’ या नावाचा उल्लेख म्यूट करावा लागणार आहे.

- Advertisement -

चित्रपटातील पात्र हे कॉमिक कॉपीराइट असताना त्याबद्दल कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही, असं म्हणतं त्यांनी कायदेशीर नोटीस बजावली होती. आलोक राजवाडे दिग्दर्शित या सिनेमात सईसोबत पर्ण पेठे, अभय महाजन, सायली पाठक, अक्षय टांकसाळे, ऋतूराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके आणि अमेय वाघ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. तर सई ताम्हणकर सविता भाभी ही व्यक्तीरेखा साकारत आहे.


हे ही वाचा – Video : सविता भाभीचा पहिला व्हीडिओ लीक!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -