घरमनोरंजनचित्रपटातील कारगिर्दीच्या पन्नाशीकडे

चित्रपटातील कारगिर्दीच्या पन्नाशीकडे

Subscribe

ज्या अभिनेत्याच्या नावाशिवाय मराठी चित्रपटसृष्टीचा विचारच केला जाणार नाही. असे अशोक सराफ गेले 49 वर्ष रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. यावर्षी अशोक सराफ आपल्या चित्रपटसृष्टीच्या प्रवासात 50 वर्षात पदार्पण करत आहेत.

ज्या अभिनेत्याच्या नावाशिवाय मराठी चित्रपटसृष्टीचा विचारच केला जाणार नाही. असे अशोक सराफ गेले 49 वर्ष रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. यावर्षी अशोक सराफ आपल्या चित्रपटसृष्टीच्या प्रवासात 50 वर्षात पदार्पण करत आहेत. विनोदाचं अचूक मीटर जपणार्‍या सराफ यांनी कित्येक संवाद अजरामर केले आहेत. विविधरंगी भूमिकांतील संवादफेक करण्याची त्यांची शैली, आपल्या भूमिकेतलं वेगळेपण दाखवण्यासाठी घेतलेली मेहनत सगळंच हटके होतं. आजही दार ठोकल्यावर धनंजय मानेंची आठवण आल्याशिवाय राहत नाही, तर गमतीनी वॉख्खॅ, विख्खी, विख्खू हेही सहज येतं. केवळ विनोदच नाही, तर अशोक यांनी साकारलेला खलनायकही तितकाच ताकदीचा होता. तर अश्विनी येना, तुझी माझी जोडी जमली गं, अशी हीट गाणी ज्यांच्या वेगळ्या स्टाईलच्या डान्समुळे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

सोनी मराठीवर अशोक सराफ सप्ताह

सोनी मराठी अशोक सराफ सप्ताह साजरा करत आहेत. गेल्या 49 वर्षांची कामगिरी लक्षात घेता या सप्ताहाला ‘सम्राट सराफ’ हे नाव देण्यात आलं आहे. ‘सम्राट सराफ’ 24 ते 30 सप्टेंबर असं सप्ताहभर चालणार असून 24 ते 29 सप्टेंबर या कालावधीत रोज दुपारी 3 वाजता अशोक सराफ यांचे ‘नवरी मिळे नवर्‍याला’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘घायाळ’, ‘आई नं.1’, ‘एकापेक्षा एक’, ‘गुलछडी’ हे चित्रपट प्रेक्षक पाहू शकणार आहेत. पोलिसांच्या संवेदना दर्शवणार्‍या ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटाने सप्ताहाची सांगता होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -