घरमहाराष्ट्रअरुण अडसड यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड

अरुण अडसड यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड

Subscribe

कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी येत्या ३ ऑक्टोबरला पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, या दिवशी फक्त एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला.

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध झाली आहे. भाजपाचे माजी आमदार अरुण अडसड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची आता विधान परिषदेवर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मात्र यासंदर्भात अधिकृत घोषणा दोन दिवसानंतर करण्यात येणार आहे. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी येत्या ३ ऑक्टोबरला पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, या दिवशी फक्त एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला. आणि तो अर्ज भाजपचे माजी आमदार अरुण अडसड यांचा होता. त्यामुळे या रिक्त जागेवर अरुण अडसड यांची बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर त्याच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

अरुण अडसर दोनदा विधानसभेत आमदार

अरुण अडसड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट आदी वरीष्ठ भाजप नेते उपस्थित होते. अरूण अडसड हे दोन वेळा विधानसभेचे आमदार होते. तसंच त्यांनी केंद्रीय कृषी आयोगाचं अध्यक्षपदही भूषवलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -