घरमनोरंजनआथिया शेट्टीचे 'नवाबजादे' ठुमके

आथिया शेट्टीचे ‘नवाबजादे’ ठुमके

Subscribe

'नवाबजादे' चित्रपटाचं अजून एक गाणं प्रदर्शित करण्यात आलं असून हे गाणं बादशाहनं गायलं आहे. 'तेरे नाल नचणा' हे गाण्याचे बोल असून हे एक पार्टी साँग आहे.

रेमो डिझुझानं निर्मिती केलेल्या ‘नवाबजादे’ची सध्या सगळीकडे चर्चा आहे. थोड्याच दिवसापूर्वी प्रदर्शित करण्यात आलेल्या वरूण धवन आणि श्रद्धा कपूरच्या ‘हाय रेटेड गबरू’ या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. गुरुवारी ‘नवाबजादे’ चित्रपटाचं अजून एक गाणं प्रदर्शित करण्यात आलं असून हे गाणं बादशाहनं गायलं आहे. ‘तेरे नाल नचणा’ हे गाण्याचे बोल असून हे एक पार्टी साँग आहे. जयेश प्रधान दिग्दर्शित या चित्रपटात पहिल्यांदाच अथिया शेट्टी गाण्यावर थिरकली आहे.

अथियाचं पहिलंच पार्टी साँग

आपल्या वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध असणारे धर्मेश येलांडे, राघव जुयाल आणि पुनीत पाठक यांची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्याबरोबरच या गाण्यामध्ये सुनील शेट्टीची मुलगी अथिया ठुमके लावताना दिसणार आहे. बादशाहनं हे गाणं गायलं असून या गाण्याच्या चित्रीकरणातदेखील बादशाह आहे. हे गाणं उडत्या गाण्यांच्या पठडीतलंच आहे. धर्मेश, राघव आणि पुनीत हे त्रिकूट एकत्र असताना अशा आशयाचं गाणं चित्रपटात असणं ही प्रेक्षकांची अपेक्षा नक्कीच असणार. त्यानुसारच या गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. संपूर्ण मसाला या गाण्यामध्ये चित्रीत करण्यात आला आहे. तिन्ही कलाकार डान्सर असल्यामुळं या चित्रपटाची गाणी अशीच जोशपूर्ण असणार याची प्रेक्षकाला कल्पना असेलच. या चित्रपटाची कथा रेमो डिसुझानंच लिहिली असून निर्मितीदेखील त्यानंच केली आहे. तर जयेश प्रधान या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. तर इशिका रिखी या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री आहे. ऑगस्टमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सध्या याचं प्रमोशन जोरात सुरु आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -